कापूस खरेदीचा अखेर मुहूर्त सापडला, २१ नोव्हेंबरपासून होणार कापूस खरेदी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

नरखेड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. याचे औचित्य साधून आता कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्यास नरखेड येथे सुरुवात करण्यात आली आहे. ही फक्त नोंदणीच असून प्रत्यक्ष कापूस खरेदी मात्र २१ नोव्हेंबरपासून होणार असून शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारातच जाणार आहे. 

जलालखेडा (जि. नागपूर): खरीप हंगामातील कापूस ‘सीसीआय'ला विक्री करण्यासाठी नरखेड येथील बाजार समितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, ही नोंदणी सुटीचा दिवस वगळून दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात करता येणार आहे व प्रत्यक्ष कापूस खरेदी २१ नोव्हेंबरपासून सीसीआय करणार आहे. तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी करून घेण्याचे आव्हान नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

नरखेड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. याचे औचित्य साधून आता कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्यास नरखेड येथे सुरुवात करण्यात आली आहे. ही फक्त नोंदणीच असून प्रत्यक्ष कापूस खरेदी मात्र २१ नोव्हेंबरपासून होणार असून शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारातच जाणार आहे. 

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

शेतकऱ्यांना नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, कोरोना विष्णूच्या प्रादुर्भावामुळे नोंदणी करिता गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवावे, मास्क लावावा व रांगेत राहून रांगेतील नंबरप्रमाणे अर्ज व कागदपत्रे सदर करून पोच पावती घ्यावी. तसेच एका शेतकर्याने एकदाच नोंदणी करावी व अर्ज भरून देतेवेळी त्यावर धारण केलेल्या सर्व शेतीचे सर्व्हे नंबर व लागवडीचे क्षेत्राचा उल्लेख करावा. शासकीय हमी भावाने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आव्हान सभापती बबनराव लोहे, उपसभापती पांडुरंग बनाईत व समस्त संचालकांनी केले आहे.

भ्रमणध्वनीवरून देणार माहिती

खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने नोंदणी लवकर सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बॅंकेच्या पासबुकची छायांकित प्रत, कापूस लागवडीची नोंद असलेला सातबारा उतारा, आठ ‘अ' आदी कागदपत्रांसह बाजार समितीत नोंद करायची आहे. खरेदी प्रारंभ होताच शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार आपला कापूस विक्री करण्यासाठी भ्रमणध्वनीवरून एकदिवस आधी कळविण्यात येणार आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना मोठी कसरत

मागील वर्षी सीसीआय व ‘नाफेड'ला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती. शिवाय जुलै महिना अखेरपर्यंत ही खरेदी सुरू ठेवावी लागली होती. यामुळे अनेकांना पावसाळ्यात त्यांचा कापूस विकावा लागला होता. अनेकवेळा कापसाच्या गाड्या पावसात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले होते.

ऑनलाईन पेरापत्रकची अडचण

कापूस विक्रीसाठी नोंदणी करतांनी सातबाऱ्यावर सन २०२०-२१ च्या पेरा पत्रकाची ऑनलाईन नोंद असणे आवश्यक असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर केले आहे. पण अद्याप ही महसूल विभागाकडून पेरापत्रकाची ऑनलाईन करण्यात आले नाही. यामुळे ऑनलाईन पेरा पत्रक असलेला सातबारा आणायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

मागीलवर्षी खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी होते व त्यातच कोरोनामुळे अनेक दिवस खरेदी बंद राहिल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण त्यावर ही मत करून सर्व कापूस खरेदी करण्यात आला. पण यावर्षी कापूस खरेदी करतांना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. याची आवश्यक ती खबरदारी घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने कापूस खरेदीचे नियोजन बाजार समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cotton selling will be start from 21 november