esakal | सभापतिपदावर नगरसेवकांचा डोळा
sakal

बोलून बातमी शोधा

वानाडोंगरी नगर परिषद

सभापतिपदावर नगरसेवकांचा डोळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणा  (जि.नागपूर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वानाडोंगरी नगर परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीची घोषणा झाली. यामुळे नगरसेवकांना सभापतिपदाचे डोहाळे लागले आहे. विद्यमान सभापती पुन्हा नवरदेवासारखे डोक्‍याला बाशिंग बांधून तयार असल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून नगर परिषदेला सभापती निवडणूक घेण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले आहे. 12 सप्टेंबरला सभापती निवडणूक होणार आहे. सद्य:स्थितीत प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 7, 8, 10 मधील नगरसेवक सभापती म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे उर्वरित प्रभागातील नगरसेवकांच्या सभापती पदाकडे नजरा लागल्या आहेत. विद्यमान सभापतींनी पुन्हा हे पद आपल्याकडेच राहिले पाहिजे, यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे बोलले जाते. यामुळे सत्ताधारी भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी यात समेट घडवून आणल्यास निवडणूक टळू शकते. अन्यथा भाजपमध्येच दोन गट पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मागील अनेक महिन्यांपासून सत्ताधारी भाजप गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. सभापती निवडणुकीवरून भाजपमधील दोन गट आमने-सामने उभे ठाकल्यास ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यामुळे सभापती निवडणुकीकडे सर्व राजकीय व वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे

loading image
go to top