देशाची वाटचाल हुकमशाहीकडे; राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची केंद्र सरकारवर टीका 

The country is moving towards dictatorship said Vijay Wadettiwar in Chandrapur
The country is moving towards dictatorship said Vijay Wadettiwar in Chandrapur

चंद्रपूर :  देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यास पंतप्रधानांना वेळ नाही. सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. कॉंग्रेसने निर्माण केलेली संपत्ती कवडीमोल भावात खासगी कंपन्यांना विकली जात आहे. पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. देशाला विकासाकडे नेण्यासाठी कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या 136 व्या स्थापना दिवस समारोहात बोलत होते. 

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा 136 वा स्थापना दिवस आज  सोमवारला शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालय परिसरात उत्साहात साजरा झाला. शहर जिल्हाध्यक्ष  रामू तिवारी यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर  उपस्थित होते.

कॉंग्रेसने देशाला प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या वाटेवर नेले.  माजी पंतप्रधान  इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशाचा विकास घडविण्यासाठी कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. 

यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर नागरिकांना लाडूचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, माजी आमदार देवराव भांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, सुभाष गौर, आसावरी देवतळे, महिला कॉंग्रेस प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर, महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनीता लोढिया, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका विना खनके, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका ललिता रेवेल्लीवार, सोहेल शेख, अश्विनी खोब्रागडे, , सुनील वडस्कर, प्रसन्ना शिरवार, उमाकांत धांडे,सचिन कत्याल, कुणाल चहारे, राजेश अड्डूर,, रुचित दवे, अजय बल्की आदींची उपस्थिती होती. 

सेल्फी विथ तिरंगा

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने स्थापनादिनाचे औचित्य साधून सेल्फी विथ तिरंगा अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तिवारी यांच्या पुढाकारातून सेल्फी विथ तिरंगा या अभियान राबविण्यात आले. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार  धानोरकर यांनी स्वतः: सेल्फी काढून अभियानाचा प्रारंभ केला. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीसुद्धा सेल्फी काढली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com