esakal | आमदार शेलारांचा राऊतांवर पलटवार, दमबाजी करू नका, दबाव टाकू नका; ईडीला हिशोब द्या
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ashish Shelar's retaliation against Sanjay Raut Amravati Political news

सगळ्या एजन्सीवर दबावतंत्राचे राजकारण शिवसेना करू पाहत आहे. भाजप अशा कुठल्याही पक्षाला या एजन्सीवर दबाव आणू देणार नाही. शिवसेनेने आधी स्वतःकडे बघावे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कर नाही तर डर कशाला, त्यामुळे राऊत यांनी डराव डराव करणे बंद करावे अशी टीका आशीष शेलार यांनी केली.

आमदार शेलारांचा राऊतांवर पलटवार, दमबाजी करू नका, दबाव टाकू नका; ईडीला हिशोब द्या

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती : आपल्या दमडीचाही हिशोब संजय राऊत यांनी ईडीला द्यावा, उगाच दमबाजी करू नये व दबाव टाकू नये. त्यांच्या दमबाजीला भाजप घाबरत नाही, असा पलटवार आमदार आशीष शेलार यांनी शिवसेनेवर केला.

शिक्षक मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी अमरावती येथे आले असताना आमदार शेलार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री प्राचार्य अशोक उईके, आ. आकाश फुंडकर, आ. प्रताप अडसड प्रामुख्याने उपस्थित होते.

जाणून घ्या - संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा

सगळ्या एजन्सीवर दबावतंत्राचे राजकारण शिवसेना करू पाहत आहे. भाजप अशा कुठल्याही पक्षाला या एजन्सीवर दबाव आणू देणार नाही. शिवसेनेने आधी स्वतःकडे बघावे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कर नाही तर डर कशाला, त्यामुळे राऊत यांनी डराव डराव करणे बंद करावे अशी टीका आशीष शेलार यांनी केली.

संजय राऊत जे काही बोलत आहेत ते तथ्यहीन आहे. एका नोटीसनेच संजय राऊत पूर्ण हादरून गेले हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यांनी जर काही चूक केलेली नसेल तर त्यांना घाबरायचे कारण नाही. या देशात कायद्याचे राज्य आहे आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ईडीने नोटीस दिली आहे तर प्रथम त्यांनी दाम-दमडीचा हिशोब देऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करावे, असेही आशीष शेलार यावेळी म्हणाले.

अधिक माहितीसाठी - गेल्या दशकात नागपुरात घडलेल्या 'त्या' ५ थरारक घटना ज्यांनी हादरलं अख्ख राज्य; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. आता ईडीच्या या समन्सवरून शिवसेना आणि भाजप पुन्हा आमने-सामने आली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

loading image