यू-ट्यूब पाहून घरफोड्या; उच्चशिक्षित बंटी-बबली जेरबंद

यू-ट्यूब पाहून घरफोड्या; उच्चशिक्षित बंटी-बबली जेरबंद

नागपूर - उच्चशिक्षित असलेल्या युवक आणि त्याच्या गर्लफ्रेंडने यूट्यूबवरून चोरी-घरफोडीचे आयडिया घेतली. त्यानुसार चोरी करण्याचे साहित्य विकत घेतले आणि आतापर्यंत पाच ते सहा यशस्वी घरफोड्यासुद्धा केल्या. हा प्रकार एका सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्याच्याकडून महागड्या कारसह जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

शैलेश वसंता डुंबरे (वय 29, वराडकर ले-आउट, संतकृपानगर, हजारीपहाड) आणि प्रिया (वय 21, रा. सुरेंद्रनगर, बजाजनगर) अशी अटकेतील बंटी-बबलीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून अनेक घरफोड्यांच्या घटनांमध्ये एक ऑरेंज रंगाच्या कारचा वापर केल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी कारचा शोध घेणे सुरू केले.

पोलिस कर्मचारी संतोष राठोड आणि राजेश वरठी यांना संशयित कार गोरेवाडा येथील एका बंगल्यात दिसून आली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी दिवसभर पाळत ठेवली. एक तरुण व तरुणी कार वापरत असून बंगल्यात राहत असल्याचे लक्षात आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्यामुळे पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी शैलेश आणि प्रिया अशी नावे सांगितली. शैलेश हा एमबीए असून प्रियाने बी.ए. फाईन आर्टचे शिक्षण घेतले आहे. दोघांनाही खाक्‍या दाखवताच त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

आलिशान कार आणि बंगला 
शैलेश आणि प्रिया या दोघांचेही आलिशान कार आणि बंगल्यात राहण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी घरफोडीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी यूट्यूबवरून घरीफोडीची आयडिया घेतली. तसेच घरफोडीसाठी लागणारे हॅंडी गॅस सिलिंडर, पाइप, कटर, पेचकच व अन्य साहित्य विकत घेतले. सहा घरफोड्यासुद्धा केल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून कार, दोन लॅपटॉप, सोन्याची लगडी, अमेरिकन डॉलर्स असा एकूण 9 लाख 87 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com