ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेचा धडा देण्यासाठी अभ्यासक्रम

योगेश बरवड
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

नागपूर - आयुष्याच्या संध्याकाळी एकटा पडलेला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वर्ग समाजात आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने एकप्रकारचे नैराश्‍य या वर्गाच्या वाट्याला आले आहे. अशा ज्येष्ठांना आधार देण्यासाठी अनेक संस्था, संघटना विविध उपक्रम राबवितात. पण, खऱ्या अर्थाने साथ देणारे कुणीतरी आवश्‍यक आहे, याचा विचार करून तरुण गृहस्वास्थ्य सहायक घडविणारा अभ्यासक्रम ‘ॲड-मॅपल’ने तयार केला आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या सेवेचे धडे देणारा हा देशातील पहिलाच उपक्रम असावा, असे बोलले जात आहे.

कामाच्या निमित्ताने किंवा अन्य कारणांनी ज्येष्ठांपासून त्यांचे आप्तेष्ट दुरावले आहेत. हे लक्षात घेऊन लाइफ स्किल फाउंडेशनने पुढाकार  घेतला. ज्येष्ठ आणि बेरोजगार तरुण या दोघांचेही प्रश्‍न परस्पर सहकार्यातून मार्गी लावण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी डॉ. राजेश्‍वरी व प्रा. अनिल वानखडे यांच्या संकल्पनेतून ‘बहुआयामी गृहस्वास्थ्य सहायक’ हा एक वर्षाचा निवासी अभ्यासक्रम तयार झाला. सेवाभाव, कौशल्य, मूल्य, नैतिकता आदी गुण असलेले बहुआयामी गृहस्वास्थ्य सहायक निर्माण होतील, अशी अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली असून फेटरी येथे प्रयोगशाळा व वसतिगृह असून एकाच वेळी शंभर तरुणांना प्रशिक्षण देण्याची सोय आहे.

वेतनाची हमी
संस्थेने प्रवेश देण्यापूर्वीच नोकरी देणाऱ्यांचा शोध घेतला आहे. गृहस्वास्थ्य सहायकाची गरज असणारे अभ्यासक्रमादरम्यान सहायकाची निवड करतील. या सहायकांना दरमहा किमान १५ हजार रुपये किमान वेतन मिळेल, अशी हमी संस्थेने दिली आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
- संस्कार, सेवाभाव, प्राणायाम, योगाभ्यासाचा समावेश
- प्रवेश घेतानाच काम देणाऱ्या आस्थापनेची निश्‍चिती
- प्रशिक्षणानंतर एक वर्ष अनुभवादरम्यान मूल्यमापन

अभ्यासक्रमाद्वारे संगणक ज्ञानापासून ते वाहनचालकापर्यंतची सर्व कौशल्ये शिकविली जातील. रुग्ण शुश्रूषा, जेवण तयार करणे, भावनिक नाते जपणारा गृहस्वास्थ्य सहायक तयार होईल. 
- डॉ. राजेश्‍वरी वानखडे, संचालक

Web Title: Courses to give lessons to senior citizens