esakal | दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बोलून बातमी शोधा

deepali chauhan suicide
दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना धारणी न्यायालयाने आज चौदा दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावली. त्यांना दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अटक करण्यात आली होती.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

25 मार्च 2021 रोजी मेळघाटच्या हरीसाल येथील वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यात गुगामल विभागाचे उपवन संरक्षक विनोद शिवकुमार विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. परंतु, दीपाली यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या पात्रात उल्लेख असूनही रेड्डीवर सुद्धा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी आग्रही मागणी विविध पक्ष संघटनानी केली होती. परंतु, वरिष्ठ स्तरावर रेड्डीचे असलेले संबंध आणि आयएफएस लॉबीच्या दाबावामुळे ते शक्य होत नव्हते. दोन दिवसंपूर्वी आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांचा मेळघाट दौरा झाला. त्या बुधवारी सकाळी मुंबईला गेल्या. त्यानंतर 24 तासातच रेड्डीला नागपूर येथून अटक झाली. रेड्डीला गुरुवारी 29 एप्रिल रोजी नागपूर वरून धारणी आणले. दुपारी त्याला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली.

हेही वाचा: कडक निर्बंधात व्यवसाय बदलण्याची वेळ; कोणी विकतो भाजीपाला, तर कोणी करतो फळविक्री

दोन दिवस स्थानिक पोलिसांनी रेड्डी यांची या प्रकरणात चौकशी केली असून रेड्डी यांनी दोन दिवस धारणी येथील लॉकअप मध्ये काढले. आज सर्वप्रथम धारणी पोलिसांनी रेड्डी यांना पोलिस स्टेशन मधून एक वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना आज पोलीस बंदोबस्तात अमरावती कारागृहात पाठविण्यात आले. तपास अधिकारी पुनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते व त्यांचे चमुने रेड्डीला अमरावती कारागृहात नेले.