वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर ) : तालुक्‍यातील डेगमा खुर्द शिवारात बुधवारच्या रात्री वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले. डेगमा खुर्द येथील गोपालक दामोदर उकुंडराव नायकोजी याची गाय बुधवारी चरायला शिवारात गेली. रात्री ती परत न आल्यामुळे त्यांनी रात्री खूप शोध घेतला. पण ती सापडली नाही. गुरुवारी (ता. 1) पहाटेच सावंगी उपवन क्षेत्रात डेगमा शिवारात दिनेश टेकाम यांच्या शेताजवळ त्याला पट्‌टेदार वाघ व त्याच्या बाजूला मृत गाय दिसली. वाघाला पाहून तो घाबरून परत गावाकडे आला. गावातील प्रवीण घवघवे, सुनील उमरे यांच्यासह काही लोकांना घेऊन पुन्हा त्या घटनास्थळी पोहोचला.

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर ) : तालुक्‍यातील डेगमा खुर्द शिवारात बुधवारच्या रात्री वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले. डेगमा खुर्द येथील गोपालक दामोदर उकुंडराव नायकोजी याची गाय बुधवारी चरायला शिवारात गेली. रात्री ती परत न आल्यामुळे त्यांनी रात्री खूप शोध घेतला. पण ती सापडली नाही. गुरुवारी (ता. 1) पहाटेच सावंगी उपवन क्षेत्रात डेगमा शिवारात दिनेश टेकाम यांच्या शेताजवळ त्याला पट्‌टेदार वाघ व त्याच्या बाजूला मृत गाय दिसली. वाघाला पाहून तो घाबरून परत गावाकडे आला. गावातील प्रवीण घवघवे, सुनील उमरे यांच्यासह काही लोकांना घेऊन पुन्हा त्या घटनास्थळी पोहोचला. दिवस उजाडला असल्यामुळे वाघ तेथून पसार झाला होता. वनविभागाला सूचना देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले व पंचनामा केला, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे यांनी दिली.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cow killed in tiger attack