कन्हान नदीच्या डोहात बुडून गुराख्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

कामठी - तालुक्‍यातील मौदा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (राजा) येथील कन्हान नदीच्या डोहात बुडून एका तरुण गुराख्याचा मृत्यू झाला. व्यंकट गंगाधर भाकरे  (वय २५, रा. चिखली त. कामठी) असे मृत गुराख्याचे नाव आहे. मृत सोनेगाव येथील प्रल्हाद धावडे यांच्याकडे गायी-म्हशी चारण्याकरिता एक महिन्यापासून नोकरी करीत होता. 

त्यांच्याकडेच मुक्कामी राहायचा. १ मे रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी ५ वाजता जनावरांना कन्हान नदीतील पात्रात पाणी पाजण्याकरिता घेऊन गेला. त्यातील काही जनावरे पाणी पिऊन झाल्यावर लागूनच असलेल्या डांगराच्या व भाजीपाल्यांच्या वाडीकडे निघाल्याने त्यांना परतविण्यासाठी व्यंकट पाण्यात उतरला. अचानक खोलगट भागात गेल्याने  त्याला बाहेर निघता आले नाही. यातच त्याचा मृत्यू झाला. येथेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी आलेल्या कृष्णा चिखलकर यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आला नाही. बुधवारी सकाळी मासेमार कैलास व त्याच्या सहकाऱ्यांनी मृतदेह शोधू काढला. मौदा पोलिसांनी पंचनामा करून व्यंकट भाकरेचे मृत शरीर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात मौदा पोलिस करीत आहेत.

घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील, प्रमोद ढोबळे, संजय भोयर, सुनील डाफ यांनी शोधकार्यात मदत केली.

Web Title: Cowboy death in kanhan river drown