"ऑपरेशन क्रॅकडाउन'ला तडा!

File photo
File photo

"ऑपरेशन क्रॅकडाउन'ला तडा!
नागपूर : शहरातील गुन्हेगारी व गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन क्रॅकडाउन'ला पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुरुंग लावला आहे. त्यामुळे शेकडो गुन्हेगारांपर्यंत पोलिस पोहोचलेच नाही. पोलिस आयुक्‍ताच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्यामुळे मोहिमेला तडा गेल्याचे बोलले जात आहे.
नागपुरातील गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वेगवेगळे अभियान प्रारंभ केले आहेत. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी व क्राइम रेट कमी करण्यासाठी आयुक्‍तांनी स्वतः रस्त्यावर उतरण्यास प्राधान्य दिले. "ऑपरेशन क्रॅकडाउन' अंतर्गत गुन्हेगारापर्यंत पोहोचून ठावठिकाणा आणि माहिती घेण्यात येत आहे. गुन्हेगारी जगतात असल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा धडाका गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांनी लावला आहे. मात्र, काही निरीक्षकांनी पोलिस आयुक्‍तांच्या आदेशाला गंभीरपणे घेतलेले नाही.
अजनीत शुक्रवारी सकाळी खून झाला. त्यातील आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांच्यावर क्रॅकडाउनअंतर्गत अजनी ठाण्यातील कुणीही कर्मचारी पोहोचला नाही. यामुळेच हे हत्याकांड घडले. पोलिस आरोपींपर्यंत आधीच पोहोचले असते, तर कदाचित हत्याकांड घडले नसते.
गुन्हे शाखेचे कौतुक
ऑपरेशन क्रॅकडाउन राबविण्यासाठी केवळ गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तत्पर आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हे शाखा प्रत्येक गुन्हेगारांपर्यंत पोहोचत आहेत. आकडेवारी पाहता ठाण्यातील कर्मचाऱ्यांपेक्षा गुन्हे शाखेची कारवाई जास्त आहे. जर गुन्हे शाखा पोलिस आयुक्‍तांच्या आदेशानुसार काम करते, तर पोलिस निरीक्षकांना ऍलर्जी का, असा सवाल विचारला जात आहे.

ऑपरेशन क्रॅकडाउनमध्ये प्रत्येक गुन्हेगारापर्यंत पोहोचून व्यक्‍तिशः चौकशी करणे आवश्‍यक आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवून गुन्हेगारी नियंत्रित करण्याचा उद्देश आहे. काही दिवसांत आम्ही हे टार्गेट पूर्ण करू.
-रवींद्र कदम,
पोलिस सहआयुक्‍त.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com