गोळी लागून पोलिस शिपाई गंभीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

गडचिरोली : स्वतःच्या रायफलमधून गोळी लागून एक पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 23) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सिरोंचा पोलिस ठाण्यात घडली.

गडचिरोली : स्वतःच्या रायफलमधून गोळी लागून एक पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 23) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सिरोंचा पोलिस ठाण्यात घडली.
एस. एस. चव्हाण असे जखमी जवानाचे नाव आहे. त्याला उपचारार्थ आंध्र प्रदेशातील वरंगल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्री. चव्हाण कर्तव्यावर असताना अचानक त्यांच्या रायफलमधून गोळी सुटली; ती त्यांच्या पोटात शिरली. यामुळे प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. ही बाब त्यांच्या सहकाऱ्याच्या लक्षात आली. लागलीच सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने श्री. चव्हाण यांना वरंगल येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.

Web Title: craime gadchiroli

टॅग्स