खड्डेच खड्डे 

file photo
file photo

भंडारा : जिल्हा रुग्णालय, बीटीबी मार्केट व स्मशानघाटाकडे जाणाऱ्या टी-पॉइंटवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. 
या मार्गाने दररोज शेकडो नागरिक वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्‍यता बळावली आहे. 
जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जुन्या पुलाकडे जाणारा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. या मार्गावर अन्न व पुरवठा विभागाचे गोदाम, पंचायत समितीचे गोदाम, परिवहन महामंडळाचे आगार, जलशुद्धीकरण केंद्र तसेच ठोक भाजीबाजार आहे. जिल्हा रुग्णालयात संपूर्ण परिसरातून बहुतांश रुग्ण याच मार्गाने येतात. जखमी, अत्यवस्थ रुग्णांना घेऊन ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकासुद्धा याच मार्गाने धावतात. याशिवाय धान्य गोदामात येणारे ट्रक, आगारात येणाऱ्या बसेस यांचाही राबता याच मार्गाने असतो. तसेच शहरातील मुख्य ठोक भाजीबाजार जलशुद्धीकरण केंद्रालगत गेला असून किरकोळ विक्रेते, शेतकरी यांना भाजीपाला विक्री व खरेदी करण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते. परंतु, आजपर्यंत या मार्गाचे पक्के बांधकाम कधीच झाले नाही. दर वर्षी चुरी व डांबरी मुलामा देऊन या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु, डांबरीकरण उखडून सातत्याने खड्डे पडूनही या रस्त्याचा कायापालट झाला नाही. 
विशेष म्हणजे जुन्या महामार्गाला जोडणारा हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व सोयीचा आहे. तरीही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे 
संबंधित विभागाने लक्ष दिलेले नाही. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे अंत्ययात्रेतही पार्थिव नेताना धक्के खावे लागतात. ही दुर्दैवाची बाब आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचून असल्याने नेहमीच तुरळक अपघात घडतात. या रस्त्याचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी शहरवासींनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com