
चंद्रपूर आणि मूल येथील संघामध्ये सामना होता. मात्र, सामना सुरु होण्यास उशीर झाला. त्यामुळे चंद्रपूरच्या संघाने प्रकाशझोतात सामने खेळविण्याची मागणी केली. तत्पूर्वी चंद्रपूर संघातील एका खेळाडूने बॉल हातात घेवून खेळपट्टीवर गोलंदाजी टाकून बघितली. यावर मूल संघातील खेळाडूने आक्षेप घेतला आणि वादाला सुरवात झाली.
चंद्रपूर : मूल येथे आयोजित "संतोष रावत चषक' या नावाने आयोजित क्रिकेट सामन्यात काल रविवारला दोन संघात तुफान राडा झाला. मारहाणीत एका संघातील खेळाडू गंभीर जखमी झाला.त्यांच्यावर चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बजरंग सेना पुरस्कृत हे क्रिकेट सामने आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष "संतोष रावत चषक' या नावाने मूल येथील सोसायटी मैदानावर क्रिकेट सामने आयोजित केले आले.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
सायंकाळी चंद्रपूर आणि मूल येथील संघामध्ये सामना होता. मात्र, सामना सुरु होण्यास उशीर झाला. त्यामुळे चंद्रपूरच्या संघाने प्रकाशझोतात सामने खेळविण्याची मागणी केली. तत्पूर्वी चंद्रपूर संघातील एका खेळाडूने बॉल हातात घेवून खेळपट्टीवर गोलंदाजी टाकून बघितली. यावर मूल संघातील खेळाडूने आक्षेप घेतला आणि वादाला सुरवात झाली.
दोन्ही संघात मैदानावरच तुफान हाणामारी झाली. काही लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. चंद्रपूरचे खेळाडू परत जाण्यासाठी मूल येथील गांधी चौकात उभे होते. त्याच दरम्यान मूलच्या काही खेळाडूंनी भाडोत्री गुंड आणणून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत संगम दहागावकर यांच्या माथ्यावर दुचाकीच्या चाबीने वार केला.
संगमच्या डोळ्याच्यावर चावी माथ्यात आत घुसली. संगम तिथेच बेशुद्ध झाला. त्यानंतर गुंडानी तिथून पळ काढला. संगमची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान प्रती वनकर, व्यंकटेश पुलकवार, अमित आसलानी, मुन्ना देव यांच्या विरोधात रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली.
संपादन - अथर्व महांकाळ