शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

नागपूर - महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचा उपाध्यक्ष पीयूष आंबटकर याने एका तरुणीवर बलात्कार केला. तिला गर्भधारणा झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून बळजबरी गर्भपात केला. यासाठी वडील पांडुरंग आंबटकर आणि जावई अमोल रघटाटे यांनी सहकार्य केले. तिघांनी संगनमताने लग्नास नकार दिल्याने युवतीने आज (ता. २१) सोनेगाव पोलिस ठाण्यात पीयूषसह तिघांविरुद्ध तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच तिघेही भूमिगत झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शिक्षण जगतात खळबळ उडाली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारे चंद्रपूर शहरात सोमय्या पॉलिटेक्‍निक, मॅकृन स्टुडंट ॲकेडमी आणि पॅरामाउंट कॉन्व्हेंट चालविले जाते. 

पांडुरंग आंबटकर शिक्षण मंडळाचा अध्यक्ष तर त्याचा मुलगा पीयूष उपाध्यक्ष आहे. नागपुरातील एका तरुणीसोबत पीयूषचे सूत जुळले. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वर्ष-दीड वर्षापासून या दोघात संबंध होते. 

काही महिन्यांपूर्वी तरुणी गर्भवती राहिल्याने तिने पीयूषकडे लग्नासाठी तगादा लावला; मात्र त्याने नकार दिला. ही बाब त्याने वडिलांना सांगितली. पांडुरंग आंबटकर आणि त्याचा जावई अमोल रघताटे यांनी पीडित तरुणीला पीयूषसोबत लग्न लावून देऊ; मात्र त्यापूर्वी आपली प्रकृती सांभाळ, असा सल्ला देत अशक्तपणामुळे उपचार घेण्यासाठी तिला नागपुरातील विम्स हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्या ठिकाणी तिच्या संमतीशिवाय गर्भपात केला. आंबटकर पिता-पुत्र आणि त्याच्या जावयाने आपली दिशाभूल केली, हे लक्षात येताच पीडित तरुणीने शनिवारी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पीयूष आंबटकर, पांडुरंग आंबटकर आणि अमोल रघताटे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Crime against the Vice President of Education Broadcasting Board