अश्‍लील व्हिडिओद्वारे युवतीला केले ब्लॅकमेल; चौघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा

Crime of atrocities against four people on Amravati
Crime of atrocities against four people on Amravati
Updated on

अमरावती : महापालिकेत कार्यरत कंत्राटी अधिकाऱ्याने नोकरीच्या शोधात असलेल्या युवतीला घरी बोलावून बेशुद्ध केले व अश्‍लील व्हिडिओ तयार केला. त्यानंतर ब्लॅकमेल करून सतत तीन साथीदारांच्या मदतीने अत्याचार केला. नोकरीसाठी तिच्याकडून दोन लाख रुपये घेतले, असा गंभीर आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी प्रदीप नरेश नितनवरेविरुद्ध (वय ३५) गुन्हा दाखल करून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीचा मित्र महापालिकेत काम करतो. त्यामुळे त्याची नितनवरे सोबत ओळख होती. युवतीच्या मित्राने तिला नोकरी मिळवून देण्यासाठी नितनवरे याच्या घरी नेले. नोकरीसाठी आवश्‍यक असलेला विनंती अर्ज मित्राने नितनवरे याला दिला. मे मध्ये नितनवरे याने युवतीला भेटीसाठी स्वत:च्या घरी बोलविले. दस्तऐवज बघितल्यावर युवतीला पिण्यासाठी पाणी दिले. पाणी पिताच ती बेशुद्ध झाली.

दोन तासांनी शुद्धीवर आली तेव्हा ती निर्वस्त्र होती. युवतीने सावरल्यानंतर पोलिस तक्रार करीत असल्याचा इशारा दिला असता तिचा निर्वस्त्र फोटो त्याने दाखविला. व्हिडिओ दाखवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. ब्लॅकमेल करून अनेकदा घरी बोलावून नितनवरे याने अत्याचार केला, असा आरोप युवतीने केला.

नोकरीसाठी वरिष्ठांना खूश करावे लागते, अशी बतावणी करून युवतीकडून दोन लाख रुपये घेतले. साहेबांना खूश केल्यास त्याच्याजवळ असलेला अश्‍लील व्हिडिओ डिलिट करण्याचे आश्‍वासन नितनवरे याने दिले होते. ज्या तिघांनी नितनवरे याच्या घरीच अत्याचार केला त्यांना युवती ओळखत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

१९ ऑक्‍टोबरला सुद्धा नितनवरे याने घरी बोलावून अत्याचार केल्याचा आरोपही युवतीने तक्रारीत केला. त्यानंतर रविवारी (ता. आठ) फोन करून धमकी दिल्याचे युवतीने तक्रारीत सांगितले. त्याआधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रदीप नितनवरेसह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सोमवारी त्याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बारकाईने तपास केला जाईल
प्रकरण महिला अत्याचाराशी निगडित असल्याने आवश्‍यक ती काळजी घेतली गेली. नितनवरेसह इतरांवरही अत्याचाराचा आरोप असल्याने त्याचा बारकाईने तपास केला जाईल.
- ज्योती बडेगावे,
पोलिस उपनिरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com