कॉटन मार्केट चौकाचा मेट्रो स्टेशनसाठी सफाया

कॉटन मार्केट चौकाचा मेट्रो स्टेशनसाठी सफाया

नागपूर - कॉटन मार्केट चौकात नझूलच्या जागेत छोटे मेट्रो रेल्वे स्टेशन
उभारण्यात येणार असल्याने कॉटन मार्केट चौकातील सुमारे पंचेवीस ते तीस दुकाने तोडण्यात आली. कारवाईदरम्यान वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती. पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.

सहा दुकानदारांनी स्टे आणल्यामुळे बिअरबार आणि काही दुकानांवरील कारवाई थांबविण्यात आली. सकाळी अकरा वाजतापासून कारवाई करण्यात आली. तीन जेसीबीसह पथकाने कारवाई सुरू केली. नझुलची जागा असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुकाने हटविण्यास दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली होती. बुधवारी पथक पोहोचताच सहा दुकानदारांनी स्टे आणून कारवाई थांबविली. नझुलच्या जागेत लीजवर जवळपास बिअरबारसह एकूण 40 दुकाने आहेत. या दुकानांची लीज 1982 सालीच संपली होती. या दुकानांच्या जागेवर मेट्रोचे छोटे रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार असल्याने येथील सर्व दुकानदारांना हटविण्यात आले आहे. सहा दुकानदारांनी स्टे आणला असला तरी स्टेची मुदत संपताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. कारवाईदरम्यान कॉटन मार्केट चौकातील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती. कारवाईत प्रवर्तन विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील, मेट्रो रेल्वेचे जे. के. नंदनवार, सावरकर, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता संजय इंदुरकर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जी. एम. जोशी, डीसीपी राजकुमार पोलिस ताफ्‌यासह उपस्थित होते. प्रवर्तन विभागाच्या तिन्ही पथकातील अली, शिंगणे, माळवे, भागडे, इरपाते इत्यादींनी कारवाई यशस्वी केली.

सुधार प्रन्यासने अतिक्रमणे हटविले
नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमणविरोधी पथकाने संघर्षनगर व यशोधरानगर मार्गावरील झोपड्यांसह 22 अतिक्रमणे काढून टाकली. वांजरी, संघर्षनगर जागेत पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित होणार आहे. येत्या एक जानेवारीला आवास योजनेचा भूमिपूजन समारंभ आहे. या योजनेकरिता ही अतिक्रमणे हटविण्यात आलीत. यशोधरा मार्गावरील चिकन बिरयानी हॉटेल, गोदामासह हॉटेल, न्हाव्याचे दुकान, लॉटरी सेंटर हटविले. तसेच एकता कॉलोनी ग्रीन स्ट्रीटमधील कच्ची घरे तोडण्यात आली. प्रन्यासच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी राठोड, शाखा अभियंता पैजान अली, प्रवर्तन अधिकारी वसंत कान्हेरे यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com