दोषींविरुद्ध गुन्हा नोंदवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

अमरावती - गर्भपातामुळे युवतीच्या मृत्यूप्रकरणी संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी गाडगेनगर ठाणेदारांना सोमवारी दिले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गाडगेनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

एका 20 वर्षीय युवतीचा नवसारी मार्गावरील खासगी रुग्णालयात गर्भपात करण्यात आला होता. मात्र, प्रकृती खालावल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. गर्भपातावेळी मुलीच्या नावासमोर तिचा पती म्हणून स्वतःचे नाव नोंदविणारा युवक त्या युवतीचे नातेवाईक रुग्णालयात येताच पसार झाला. मृत युवतीचे वास्तव्य फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील असल्याने राजापेठ पोलिसांकडून हे प्रकरण फ्रेजरपुरा पोलिसांकडे पाठविण्यात आले. मात्र, तिच्या मृत्यूस गर्भपात कारणीभूत ठरल्याने, तसेच गर्भपाताचे ठिकाण गाडगेनगर ठाणे हद्दीतील असल्याने फ्रेजरपुऱ्याच्या ठाणेदाराने हे प्रकरण आज गाडगेनगर पोलिसांना वर्ग केले आहे.

दरम्यान, महाविद्यालयाला जात असल्याचे सांगून ती युवती 13 एप्रिलला घरून गेली होती. त्यानंतर मात्र, तिचा मृतदेहच घरी पोचला.

Web Title: crime girl abortion death case