बोगस डॉक्टरवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने केली कारवाई

राधा क्रिष्ण चिकित्सालय नावाचे चिकित्सालय तो चालवित होता
crime news Food and Drug Administration Department action against bogus doctor gadchiroli
crime news Food and Drug Administration Department action against bogus doctor gadchirolisakal

गडचिरोली : अधिकृत पदवी नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवत बेकायदेशीर अ‍ॅलोपॅथी औषध विक्री व वापर करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवार (ता. १०) दुपारी २. ३० वाजता छापा मारत कारवाई केली. बिभासा अनिल मंडल (वय ३८) रा. मौशीखांब (चक), असे या व्यक्तीचे नाव आहे. बिभासा मंडल याने घराच्या आत, बेडवर आणि सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात अ‍ॅलोपॅथिक औषधी लपवून ठेवल्या होत्या. राधा क्रिष्ण चिकित्सालय नावाचे चिकित्सालय तो चालवित होता. त्याच्याकडे शेड्यूल एच, शेड्यूल एच १ या गटातील अ‍ॅलोपॅथिक औषधींचा तब्बल ७० हजार ७०० रुपयांचा अनधिकृत साठा आढळून आला.

विशेष म्हणजे शेड्यूल एच १ औषध फक्त एमबीबीएस, एम डी पदवी प्राप्त डॉक्टरच लिहू शकतात, असे सरकारचे आदेश आहेत. पण, बिभासा मंडल या औषधी सर्रास वापरत होता. शिवाय त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्टिरॉईड्स मिळाले. कोणतेही शास्त्रीय वैद्यकीय ज्ञान असताना दिलेल्या अशा औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. याशिवाय त्याच्याकडे ब्लड टेस्टिंग, मलेरिया टेस्टिंग कीटसुद्धा आढळून आल्या. त्यातही गंभीर बाब म्हणजे त्याच्याकडे एकाही औषधाचे खरेदी बिल नाही. पथकाने त्याच्याकडील नमूने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविले. आता त्याला नोटीस देऊन पुढील करण्यात येईल. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नीरज लोहकरे, औषध निरीक्षक नालंदा उरकुडे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com