अकोल्यात गुन्हेगारीचं ‘वय’ होतेय कमी! 

crime
crime

अकोलाः  सोळावं वरिस धोक्याचं गं...सोळावं वरिस धोक्याचं... वयाला उद्देशून असलेले हे गीत आपण नेहमीच ऐकतो. मात्र, आता अकोल्याच्या गुन्हेगारी जगतात पंचविसावं वरिस धोक्याचं रे...पंचविसावं वरिस धोक्याचं असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये २० ते ३० वर्षातील तरूणाई अडकत चालली आहे. यानिमीत्ताने सामाजिक चिंतनाचा एक नवा विषय पुढे आला आहे. 

अकोला आणि गुन्हेगारी हे समीकरण काही नवे नाही. राज्यातील गुन्हेगारीच्या पटलावर अकोल्याचे नाव ठळक आहे. त्याला इतिहासही तसाच रक्तरंजित जरी नसला तरी धडकी भरविणारा असाच आहे. परंतू सध्या अकोल्यात घडत असलेल्या लागोपाठ घटनावरून गुन्हेगारीचे ‘वय’ कमी तर होत नाही ना? असा सवाल या निमीत्ताने चर्चिल्या जात अाहे. वय वर्ष २० ते ३० या वयोगटातील तरूणांचा खूनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचे दिसून येते. कारण मोठी उमरी परिसरात धुलीवंदनाच्या दिवशी घडलेल्या हत्याकांडातील मृतक आणि मारेकऱ्यांचे वय हे जेमतेम २५ ते ३० वर्षाच्या जवळपास आहे. मृतक हरीश शत्रुघ्न भातुलकर याचे वय २६ आणि गणेश निबोंकार, सागर घाटे, श्रीकांत उर्फ बाबू पाठणकर या तीनही आरोपींचे वय २५ ते २८ च्या जवळपास आहे. तर डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.२८) सावत्र मामाचा भाच्याने दगडाने ठेचून खून केला. यात मामाचे वय जरी ४३ वर्ष असले तरी अारोपी सागर चौधरीचे वय मात्र केवळ २३ वर्ष ऐवढे आहे. एकूणच कारण क्षुल्लक असो वा गंभीर परंतू खून करण्यापर्यंत मजल मारण्याची मानसिकता युवकांची का होत आहे? असा प्रश्न सध्या समाजाला अात्मचिंतन करायला लावणारा आहे. 

धारदार शस्त्रे बाळगणाऱ्याचे वय १७ वर्ष 
जुने शहरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ८ मार्च एका अल्पवयीन विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीनाकडून दोन फरश्या, एक लांब पात्याचा चाकू जप्त करण्यात आला होता. ताब्यात घेण्यात अालेला हा अल्पवयीन खून प्रकरणातील आरोपी होता. २०१७ मध्ये डाबकी रोड परिसरातील बाळापूर नाक्यावर झालेल्या खून प्रकरणातील आरोपी ही अल्पवयीन जमानतीवर बाहेर आला होता. त्याचे वय केवळ १७ वर्ष ५ महिने एवढे आहे. 

कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांततेच्या मार्गाने मार्गक्रम करून संतुलन ढळू देऊ नये. सर्वांसाठी कायदा सारखा असून, गंभीर गुन्ह्यापासून दुर राहणे हे सजग आणि संस्कृत समाजाचे लक्षण आहे. विशेष म्हणजे पालकांनी पाल्यांकडे लक्ष देऊन अशा गुन्ह्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करावा. 
-विक्रांत देशमुख, अपर पोलिस अधीक्षक, अकोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com