एटीएम फोडणाऱ्या टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नागपूर - जरीपटका भागातील एसबीआय बॅंकेचे तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील चौघांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. टोळीतील एका महिलेसह दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५२ लाख  ७३ हजार रुपये, स्कॉर्पियो कार आणि पिस्तूल जप्त केले. 

नागपूर - जरीपटका भागातील एसबीआय बॅंकेचे तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील चौघांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. टोळीतील एका महिलेसह दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५२ लाख  ७३ हजार रुपये, स्कॉर्पियो कार आणि पिस्तूल जप्त केले. 

अर्शद खान रहेमान खान, आसिफ खान हारून खान, अब्दल्ला मजीद, इरफान खान जानू खान (सर्व रा. हरियाना) अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास जरीपटक्‍यातील पाटणकर चौक आणि पॉवर ग्रीड चौकातील एसबीआय बॅंकेचे तीन एटीएम गॅस कटरने फोडले. पहिल्या एटीएममधून ११ लाख ३५ हजार रुपये, दोन एटीएममधून २७ लाख आणि १६ लाख रुपये लुटले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली. 

पोलिसांना दिला चकमा
पोलिसांनी तत्काळ २० किलोमीटर अंतरावर नाकाबंदीच्या सूचना दिली. तेथूनही बॅरीकेड्‌स तोडून त्यांनी पळ काढला. 

बेवारस कार आढळली
त्यांची कार चिखली परिसरात बेवारस उभी होती. शेतातील मजुरांकडे चौकशी असता सहा ते ते सात जण वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्याची सांगितले.  त्यांच्याकडे बॅग होत्या असेही सांगितले. 

नागरिकांनी पडकले दोघांना
चिखली खुर्द गावात काही नागरिकांनी संशयास्पद फिरत असलेल्या दोघांना बॅगसह पकडले. नागरिकांनी बॅगची झडती घेतली असता बॅगमध्ये लाखो रुपये आणि पिस्तूल दिसले. गावकऱ्यानी दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. तर दोघांना नांदुरा रोडवरील एका ढाब्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.

एटीएम लुटणाऱ्या टोळीत महिलेसह सात आरोपींचा समावेश आहे. आरोपींनी खामगाव  पोलिसांवर पिस्तूल रोखल्याचा गुन्हाही आरोपींवर दाखल आहे. नागपूर पोलिसांचे पथक खामगावला रवाना झाले. 
- सुहास बावचे (पोलिस उपायुक्‍त, झोन-५)

असा लागला सुगावा
आरोपी कारने खामगाव मार्गाने दिल्लीच्या रस्त्याने जात होते. शिवाजीनगर पोलिस वाहनांची तपासणी करीत होते. दिल्ली पासिंगची कार भरधाव जाताना दिसल्यानंतर पोलिसांनी पाठलाग  केला. जुन्या टोलनाक्‍याजवळ गाडीचे थांबवल्यावर सर्व घाबरले होते. चालकास डिक्की उघडण्याच्या सूचना केली असता चालकाने गाडी घेऊन पळ काढला.

Web Title: Criminal Gang arrested