पिकांचे उत्पादन सरासरी, प्रतवारी घसरणार; ‘गुलाब’ येतोय

Farmer News
Farmer NewsFarmer News

अमरावती : सोयाबीन पीक काढणीच्या ऐन हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावली. सप्टेंबरमधील सततच्या पावसाने पिकांच्या उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतवारीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने पाऊस लवकर थांबणार नसल्याचा अंदाज वर्तविला आहे.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत १८.१ मिमी पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत एकूण २६५ मिमी पाऊस बरसला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत तो सरासरी १९९.२ टक्के आहे. मूग, उडीद व सोयाबीन काढणीचा हा हंगाम आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढणी सुरू झाली असून नवीन सोयाबीन बाजारात आला आहे. अशा वेळी पावसाने हजेरी लावल्याने उत्पादनाच्या सरासरीसोबतच प्रतवारी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१५ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती; प्रियकराविरुद्ध गुन्हा

गतवर्षी आतापर्यंत जिल्ह्यात ७४० मिमी पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत १९ मिमी पाऊस अधिक झाला असून, ८३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मेळघाटातील दोन तालुके व पायथ्याच्या अचलपूर तालुक्यात मात्र अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. धारणी तालुक्यात ७४६ मिमी (७१ टक्के), चिखलदरा ८४६ मिमी (६३ टक्के) व अचलपूर तालुक्यात ६९५ मिमी (८८ टक्के) पाऊस झाला आहे.

गुलाब चक्रीवादळाची भीती

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून हवामान खात्याने याचे नामकरण ‘गुलाब’ असे केले आहे. हे वादळ विदर्भाकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. परंतु, जमिनीवर पोहोचल्यावर या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.

- प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com