अमरावतीत दुकाने उघडताच मोबाईल खरेदीसाठी गर्दीचगर्दी

cell phone
cell phone
Updated on

अमरावती : कोरोनाने आरोग्यापासून शिक्षणापर्यंतचे सगळे आराखडेच बदलले आहेत. मार्चपासून बंद झालेल्या शाळा आगामी सत्रातही सुरू होण्याची चिन्हे सध्या तरी नाहीत, शासनाने शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. तसे असेल तर मुलांजवळ मोबाईल असणे अत्यंत गरजेचे आहे. एका कुटुंबात दोन मुले असतील तर पालकांना दोन मोबाईल घेणे आवश्‍यकच आहे. खरे तर गेल्या दोन महिन्यांपासूनच्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकच जण आर्थिक अडचणीत आहे. तरीही मुलांचे हित लक्षात घेता पालकांनी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.

आज दुकाने उघडताच पालकांनी मोबाईल घेण्यासाठी गर्दी केली होती. दहा ते पंधरा हजार किंवा आपल्या ऐपतीनुसार मोबाईलची खरेदी त्यांनी केली. शैक्षणिक सत्र कशा पद्धतीने सुरू करता येईल, याकरिता सकारात्मक विचार सुरू करण्यात आला असला तरी, शासनाने अंतिम निर्णय घेतलेला नाही.
जुलै महिन्यामध्ये शैक्षणिक वर्षासंदर्भात निर्णय होईल. ऐनवेळी मोबाईल, टॅब आपल्याला मिळणार नाही, पाल्यांच्या शिक्षणाची गैरसोय होण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे पालकांनी आधीच तयारी केली. शहरात काही नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची तयारी सुरू केली. पालक त्यासाठी तयार आहेत किंवा नाही, असे पालकांकडून लिहूनसुद्धा घेतले. अनेक पालकांनी शाळांच्या प्रतिसादाला होकार देण्याची तयारी ठेवली आहे. तर, काही पालकांपुढे ऑनलाइन शिक्षणासाठी ऍण्ड्रॉईड मोबाईल किंवा टॅब खरेदी करणे आर्थिक दृष्टीने परवडण्यासारखे नाही.
घरात एखादा मोबाईल असला तरी तो आपल्या पाल्याजवळ द्यायचा की, स्वत:च्या कामासाठी वापरायचा हा प्रश्‍नसुद्धा अनेकांपुढे आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षण संचालक, मुख्याध्यापकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यातही ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेला विरोध करण्यात आला, त्यामुळे या प्रक्रियेत दोन मतप्रवाह दिसून येतात.
विद्यार्थी हित महत्त्वाचे
शिक्षण प्रक्रियेत खंड पडणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. ज्या शाळा योग्य खबरदारी घेऊन उघडणे शक्‍य आहे, अशा ठिकाणी टप्प्या टप्प्याने विद्यार्थ्यांना बोलावून शिकविणे शक्‍य होते काय? याचाही विचार करण्याची गरज आहे.
पंडित पंडागळे, माजी उपशिक्षणाधिकारी, जि. प. अमरावती
सविस्तर वाचा - उपराजधानीला मिळतेय ही नवी ओळख, वाचा हे जळजळीत वास्तव

ऑनलाईन शिक्षण उपक्रम स्तुत्य
ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम स्तुत्य आहे. श्रमजीवी लोकवस्तीतील चाळीस टक्के पालकांजवळ ऍण्ड्रॉईड मोबाईल आहेत. उर्वरित पालकांपुढे अडचण आहे. त्यासाठी नव्याने उपाययोजना आखावी लागेल.
प्रवीण दिवे, मुख्याध्यापक, श्रीराम विद्यालय, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com