esakal | अरे हे काय! याला म्हणतात का फिजिकल डिस्टन्सिंग?...प्रशासन कोरोनाची वाट पहातयं का?
sakal

बोलून बातमी शोधा

bank line in buldana district.jpg

टाळेबंदी काळात शारीरिक अंतराचे पालन करावे अशा कडक सूचना असतानाही मेहकर येथील तहसील कार्यालय व बँकेसमोर नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे.

अरे हे काय! याला म्हणतात का फिजिकल डिस्टन्सिंग?...प्रशासन कोरोनाची वाट पहातयं का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहकर (जि.बुलडाणा) : जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी आता 11 तालुके करोना बाधित झाले असून, लोणार तालुक्यातील अहवाल प्रलंबित असल्यामुळे निश्‍चित झालेला नाही. तथापि, मेहकर तालुक्यात अद्यापही एक बाधित रुग्ण आढळलेला नाही. 

त्यामुळे प्रशासनाला अधिक सतर्क राहून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. परंतु, येथील तहसील आणि सर्वच बँकेसमोरील परिस्थिती ही अत्यंत धोकादायक परिस्थितीत असून, फिजिकल स्टिन्ससिंगचे कोणतेही नियम येथे पाळल्या जात नसल्यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - Breaking : लातूर पोलिस ट्रेनिंग कॅम्पमधून आलेला युवक बाधीत; या तालुक्यात पुन्हा कोरोना प्रवेश

टाळेबंदी काळात शारीरिक अंतराचे पालन करावे अशा कडक सूचना असतानाही मेहकर येथील तहसील कार्यालय व बँकेसमोर नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे. या गर्दीमुळे नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असून तहसील कार्यालय व बँकेसमोर पोलिस बंदोबस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असून, पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी बँकेसमोर पीक कर्ज घेण्यासाठी गर्दी करत आहे.

आवश्यक वाचा - अरे देवा! कोरोनामुळे या जिल्ह्यात एकाच दिवशी तीन मृत्यू; 20 पाॅझिटिव्ह

मात्र, ही गर्दी करत असताना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. शारीरिक अंतराचे पालन होताना दिसत नाही. शहरातील राष्ट्रीयीकृत बँकेसमोर दररोज गर्दी होत आहे. बँक कर्मचार्‍याकडून वेळोवेळी शेतकर्‍यांना शारीरिक अंतराचे पालन करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. मात्र, या सूचनेचे पालन होताना दिसत नाही. याच बरोबर पीक कर्जासाठी शेतकरी कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. सदर कागदपत्र साठी स्टॅम्प पेपरची सुद्धा गरज भासते. 

त्यामुळे स्टॅम्प पेपर घेण्यासाठी शेतकरी तहसील कार्यालयातही गर्दी करीत आहे. गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे तहसील कार्यालयात व विविध राष्ट्रीयीकृत बँकेसमोर पोलिस बंदोबस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. शनिवार, रविवार व सोमवार अशा सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे शेतकर्‍यांनी 26 मे ला विविध बँकेसमोर व तहसील कार्यालयात एकच गर्दी केली होती.