नक्षलवाद्यांसाठी लढणारे हात सरसावले गरीबांसाठी, सीआरपीएफच्या जवानांनी तयार केले अनोखे वाफारा यंत्र

भाविकदास करमनकर
Friday, 20 November 2020

अडचण लक्षात घेत सीआरपीएफच्या काही जवानांनी विविध प्रकारच्या वाफारा यंत्रांचा अभ्यास करून अनेकांना एकाच वेळी वाफारा घेता येईल, असे अनोखे मशीन तयार केले आहे. या मशीनमुळे अनेकांना वाफारा घेऊन आपले आरोग्य नीट राखता येईल व कोरोनापासूनही वाचता येईल, असा विश्‍वास सीआरपीएफच्या 113 बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी व्यक्त केला आहे.

धानोरा ( जि. गडचिरोली ) :  नक्षलवाद्यांशी लढणारे हात नागरिकांच्या हितासाठीही झटत आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांना आरोग्याची काळजी घेता यावी, यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलातील १३३ बटालियनने अनोखे वाफारा यंत्र तयार केले आहे. त्याचा गडचिरोलीसारख्या मागास भागातील गरीब जनतेला लाभ होणार आहे.

हेही वाचा - डिजिटल युगातही शेतकरी देतो पत्राद्वारे शुभेच्छा, ३७...

सीआरपीएफच्या 113 बटालियनने बनविलेल्या वाफारा यंत्राचे प्रात्यक्षिक स्टेट बँक ऑफ इंडिया समोर करण्यात आले. कोरोनावर अजूनपर्यंत औषध किंवा लस उपलब्ध झाली नाही. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात साबणाने वारंवार धुणे, तोंडाला मास्क बांधणे अत्यावश्‍यक आहे. त्याचसोबत गरम वाफारा घेतल्यास कोरोना संसर्गात बराच लाभ होतो. मात्र, अनेक नागरिक महागडे वाफारा यंत्र घेऊ शकत नाही. गडचिरोलीसारख्या मागास, गरीब जिल्ह्यात वाफारा यंत्र प्रत्येकाला परवडत नाही. त्यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असताना वाफाऱ्याची सोय नसते. ही अडचण लक्षात घेत सीआरपीएफच्या काही जवानांनी विविध प्रकारच्या वाफारा यंत्रांचा अभ्यास करून अनेकांना एकाच वेळी वाफारा घेता येईल, असे अनोखे मशीन तयार केले आहे. या मशीनमुळे अनेकांना वाफारा घेऊन आपले आरोग्य नीट राखता येईल व कोरोनापासूनही वाचता येईल, असा विश्‍वास सीआरपीएफच्या 113 बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - बेलारातील अनाथांना मदतीचा हात; आई-वडिलांच्या मृत्यूने...

लाभ घेण्याचे आवाहन -
केंद्रीय राखीव पोलिस दलाने कोरोना काळातील नागरिकांची गरज लक्षात घेत त्यांच्या काळजीपोटी हे वाफारा यंत्र तयार करण्यात केले आहे. शिवाय याचे प्रात्यक्षिकही यशस्वी झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या वाफारा यंत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीआरपीएफच्या 113 बटालियन कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crpf soldiers made steamer in dhanora of gadchiroli