esakal | VIDEO : बेलारातील अनाथांना मदतीचा हात; आई-वडिलांच्या मृत्यूने चिमुकले झाले अनाथ
sakal

बोलून बातमी शोधा

pravin kulate help to orphan child in belara of chimur

चिमूर तालुक्‍यातील बेलारा येथील प्रमोद रामचंद्र जीवतोडे याच्या पत्नीचे पंधरा महिन्यांपूर्वी निधन झाले. आईविना पोरकी झालेल्या तीन महिन्यांचा कार्तिक आणि दोन वर्षांचा नैतिकचा सांभाळ प्रमोद आईवडिलांच्या सहकार्याने करीत होता. मात्र, 13 नोव्हेंबरला प्रमोदवरही काळाने घाला टाकला.

VIDEO : बेलारातील अनाथांना मदतीचा हात; आई-वडिलांच्या मृत्यूने चिमुकले झाले अनाथ

sakal_logo
By
जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : आजच्या गतिशील काळात माणसा माणसांतील संवाद संपला आहे. नात्यांमध्ये आपुलकी राहिली नाही.  मात्र, याही परिस्थितीत दुसऱ्याच्या दु:खाने व्याकूळ होणारी माणसे समाजात आहे. याची प्रचिती चिमूर तालुक्‍यात आली. चंद्रपुरातील प्रवीण कुलटेंनी अनाथ झालेल्या दोन्ही भावंडांना मदत केली. त्यांना या अनाथांची माहिती समाज माध्यमातून समजली.

हेही वाचा - विदेशातील गुंतवणूक भोवली, राष्ट्रवादीचा बावनकुळेंवर...

चिमूर तालुक्‍यातील बेलारा येथील प्रमोद रामचंद्र जीवतोडे याच्या पत्नीचे पंधरा महिन्यांपूर्वी निधन झाले. आईविना पोरकी झालेल्या तीन महिन्यांचा कार्तिक आणि दोन वर्षांचा नैतिकचा सांभाळ प्रमोद आईवडिलांच्या सहकार्याने करीत होता. मात्र, 13 नोव्हेंबरला प्रमोदवरही काळाने घाला टाकला. स्वतःच्या शेतातील सौर कुंपणाच्या तारांत पाय अडकल्याने विजेचा धक्‍क्‍याने त्यांचा मृत्यू झाला. प्रमोदच्या मृत्यूने कार्तिक आणि नैतिक अनाथ झाले. याची माहिती चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुलटे यांना झाली. या घटनेने तेही अस्वस्थ झाले. 

हेही वाचा - इतके वैर कशासाठी? पुन्हा धानाचे पुंजणे जाळले, चार दिवसांतील दुसरी घटना

आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या या दोन्ही मुलांना आर्थिक मदत देण्याचा निश्‍चय कुलटे यांनी केला. मित्रांसोबत चिमूर गाठले. मुलांचे आजोबा रामचंद्र जिवतोडे यांचे घर गाठले. दिवाळीच्या फटाक्‍यांच्या आतषबाजीचा खर्च त्यांनी टाळला. कुलटे आणि त्यांच्या मित्रांनी जमा केलेल्या रकमेचा धनादेश जिवतोडे यांच्याकडे सुपूर्द केला. माणुसकीच्या या ओलाव्याने नैतिक आणि कार्तिकच्या आजी-आजोबांना गहिवरून आले. त्यांनी मदतीबद्दल आभार मानले. आई वडिलांच्या अचानक जाण्याने अनाथ झालेल्या या दोन्ही मुलांना दिलेली मदत अल्प आहे. सामाजातील दानशूर व्यक्तींना या दोन्ही मुलांना मदत करावी, असे आवाहन प्रवीण कुलटे यांनी केले. 

loading image
go to top