पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच सीआरपीएफ जवानाने स्वत:वर झाडली गोळी

पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच सीआरपीएफ जवानाने स्वत:वर झाडली गोळी

धानोरा (जि. गडचिरोली) : पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी कळताच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी (CRPF trooper commits suicide) झाडून जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास धानोरा पोलिस ठाण्यात घडली. चंद्रभूषण जगत असे मृत जवानाचे नाव आहे.

धानोरा पोलिस ठाण्याच्या आवारात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ११३ क्रमांकाच्या बटालियनचा कॅम्प आहे. तेथे चंद्रभूषण जगत हा जवान कार्यरत होता. चंद्रभूषण गुरुवारी सकाळी कर्तव्यावर होता. त्याच्या पत्नीने आज सकाळी साडेसात वाजता गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी त्याला कळली. या बातमीने विचलित होऊन चंद्रभूषणने काहीही विचार न करता स्वत:वर बंदुकीची गोळी (CRPF trooper commits suicide) झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात हलविले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच सीआरपीएफ जवानाने स्वत:वर झाडली गोळी
भाजपच्या विजयानंतर मुलायम यांच्या धाकट्या सूनेचे दोन ओळीत ट्विट

चंद्रभूषण छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील कुकुर्दीकरा येथील रहिवासी असून त्याची पत्नी गावी राहत होती. काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते आणि सुट्या आटोपून तो काही दिवसांपूर्वीच धानोरा येथे कर्तव्यावर रुजू झाला होता, अशी माहिती मिळाली आहे. पत्नीच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळले (commits suicide) नाही. घटनेचा तपास धानोरा पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com