Curfew : अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू; घराबाहेर पडण्यास मनाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संचारबंदी आदेश लागू

अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू; घराबाहेर पडण्यास मनाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती शहरात शनिवारी बंद दरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलिस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला.

प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे की, अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे. संचारबंदी कालावधीत कोणताही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही.

हेही वाचा: अमरावती बंद : नमुना गल्लीमध्ये निघाले शस्त्र; आता तणावपूर्ण शांतता

कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये. या आदेशाचा भंग करणारा कोणताही व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: ‘चुकीच्या फोटोंवरून आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न’

जाळपोळ, दुकानांची तोडफोड

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या आंदोलनात झालेल्या दगडफेकीचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी पुकारलेल्या बंद दरम्यान हिंसाचार उफाळून आला. राजकमल, नमुना गल्ली, अंबापेठ या भागात दुकाने व वाहनांची जाळपोळ, तोडफोड झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. राजकमल चौक, नमुना गल्ली, अंबापेठ परिसरातील पाच ते सहा दुकानांचे कुलूप तोडून तोडफोड करण्यात आली. काही पानटपऱ्याही फोडण्यात आल्या. शिवाय संतप्त जमावाने तोडफोड केल्यानंतर पाच ते सहा दुकानांना आग लावली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले.

loading image
go to top