Devendra Fadnavis : ‘चुकीच्या फोटोंवरून आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis

‘चुकीच्या फोटोंवरून आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न’

नागपूर : त्रिपुरा घटनेच्या निषेध करण्यासाठी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनी वेगळेच वळण घेतले आहे. हिंदूंची दुकाने टार्गेट केली जात आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या चुकींच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहे. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शुक्रवारनंतर शनिवारीही अमरावतीमध्ये मोर्चे थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यामुळे हिंसक वळण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा करावा लागला. अमरावतीत चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. शांतता राखणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: अमरावती बंद : नमुना गल्लीमध्ये निघाले शस्त्र; आता तणावपूर्ण शांतता

मोर्चातून हिंदूंच्या दुकानांना मुद्दाम टार्गेट केले जात आहे. हे थांबायला हवे. त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. याचा आमीही निषेध करतो आणि शांतता राखण्याचे आवाहन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

loading image
go to top