सिलींडरचा साठा करणा-यांची जामिनावर सुटका 

file Photo
file Photo

कोदामेंढी (जि.नागपूर) : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अवैध साठा बाळगून काळाबाजार करणारा मुरमाडी येथील गणेशसिंग आत्माराम देवतारे याच्या घरी मंगळवारी(ता.17) पुरवठा अधिकारी आणि गुन्हे शाखेने छापा टाकला. आरोपीची प्रकृती ठिक नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. तब्बल नऊ दिवसानंतर अरोली पोलिसांनी बुधवारी(ता. 25) रोजी गॅस सिलिंडरचा साठा बाळगणारा गणेशसिंग आत्माराम देवतारे (रा. मुरमाडी), एचपी गॅस एजेन्सीचे दाजीबा कोचे, परिमल गुज्जर (दोघेही रा. भंडारा) यांना अटक करून मौदा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली. 
पारडी येथील गॅस एजेन्सीचे अग्रवाल यांना ताब्यात घेणार असल्याचे ठाणेदार विवेक सोनवणे यांनी सांगितले. गणेशसिंग देवतारे यांच्याकडे ग्राहकांचे 846 ग्राहकपुस्तिका आढळून आल्याने ग्राहकांचे बयान नोंदविण्यासाठी गावागावात दवंडी देण्यात आली. स्फोटजन्य पदार्थ गावात आणि घरात ठेवणे, लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणे आणि ग्राहकांची लूट तसेच फसवणूक करणे यामुळे देवतारे याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात आणखी भारतीय दंड कायद्यानुसार कलम समाविष्ट होणार असल्याचे दिसून येत आहे. 
पुरवठा अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या वतीने इतकी मोठी कारवाई केली. त्यामुळे ग्राहकांची लूट थांबेल, असे वाटले होते. मात्र आजही ग्रामीण भागातील परिसरात दलाल आणि गॅस एजेन्सीमार्फत ग्राहकांची लूट सुरु आहे. घरपोच सिलिंडर पोहचविण्याची एजंसीची जबाबदारी असताना देखील एका सिलिंडरमागे ग्राहकांना पन्नास ते शंभर रुपये जादाचे मोजावे लागत आहे. ही ग्राहकाची होणारी लूट थांबविण्यासाठी पुरवठा अधिकारी, पोलिस प्रशासन आणि संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
पुन्हा एका गॅस एजंशीधारकाला ताब्यात घेणे आहे. ग्राहकांना सूचना देण्यात आली असून त्यांचे बयान नोंदविल्यानंतर फसवणूक होत असल्याचे आढळून आल्यास आणि स्फोटजन्य पदार्थाचा साठा घरी ठेवण्यावरून आरोपी विरोधात कलम वाढविण्यात येणार आहे. 
विवेक सोनवणे 
ठाणेदार, अरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com