सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

जलालखेडा (जि. नागपूर) : पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिलिंडरचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना असूनही कारवाई होत नव्हती. याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुरुवारी नरखेड तालुक्‍यातील दोन ठिकाणी धाड टाकून घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या. कारवाईत विविध कंपनींचे 31 सिलिंडर व ग्राहकांचे 35 कार्ड जप्त केले. 

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गॅस कंपनीचे वितरक सिलिंडरचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. तसेच त्यांच्याकडे खाली व भरलेल्या सिलिंडरचा साठा असून, ग्राहकांचे कार्डही असल्याचे समजले. या गुप्त माहितीच्या आधारावर पथकाने गुरुवारी सायंकाळी धाड टाकली. यात त्यांना विलास निमजे (रा. भारसिंगी) यांच्या घरी एचपी कंपनीचे भरलेले दोन व इंडेन कंपनीचे भरलेले सात असे नऊ सिलिंडर आढळले. यानंतर पथकाने दावसा येथील कांचन सोनारे व राऊत यांच्या घरी धाड टाकली असता इंडेनचे भरलेले 8, खाली 2 व भारतचे भरलेले 8 असे अठरा सिलिंडर आढळले. धाडीत पथकाला ग्राहकांचे 35 कार्डही मिळाले. यात उज्ज्वला योजनेअंतर्गत दिलेल्या कनेक्‍शनच्या कार्डचाही समावेश होता. याची माहिती नरखेड येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आली. सर्व माल जप्त करून जलालखेडा पोलिस ठाण्यात आण्यात आला व महाराष्ट्र जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम 1955, कलम 3, 7 अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cylinder trades