हजारोंच्या साक्षीने कौंडण्यपुरात दहीहंडी; विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी जात असतात. परंतु, अनेक वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्‍य नसते. ते वारकरी कौंडण्यपूरला कार्तिकी एकादशीला येतात. याठिकाणी वारकरी संप्रदायाचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्‍मिणीचे भव्य मंदिर असून कार्तिक पौर्णिमेपासून यात्रा, दहीहंडी व काला यासह विविध कार्यक्रम करण्यात येतात.

तिवसा (जि. अमरावती) : प्राचीन विदर्भाची राजधानी आणि विठ्ठल-रुक्‍मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथे विठ्ठल-रुक्‍मिणीची बुधवारी शासकीय महापूजा पार पडली. तिवशाचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून पूजा केली. दरम्यान, हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने दहीहंडी पार पडली. 

दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी जात असतात. परंतु, अनेक वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्‍य नसते. ते वारकरी कौंडण्यपूरला कार्तिकी एकादशीला येतात. याठिकाणी वारकरी संप्रदायाचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्‍मिणीचे भव्य मंदिर असून कार्तिक पौर्णिमेपासून यात्रा, दहीहंडी व काला यासह विविध कार्यक्रम करण्यात येतात.

वर्धा नदीकाठी वसलेल्या या तीर्थक्षेत्रस्थळी बुधवारी सकाळी विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा तहसीलदार वैभव फरतारे यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर दुपारी रिंगण सोहळ्यासह विविध कार्यक्रम पार पडले. सायंकाळी साडेपाच वाजता दहीहंडी झाली. सोहळ्याला खासदार नवनीत राणा, जगत्‌गुरू राजेश्‍वर महाराज, जि. प. सदस्य पूजा आमले, शिवसेनेचे राजेश वानखडे, यशोमती ठाकूर यांच्या कन्या आकांशा, संस्थेचे विश्‍वस्त अतुल ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

शेकडो पालख्यांची प्रदक्षिणा 
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांच्या शेकडो पालख्यांनी गावाला प्रदक्षिणा घातली. या वेळी प्रत्येक पालखीचे विठ्ठल-रुक्‍मिणी संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi in Kowadanyapur, witnessed by thousands; Vitthal-Rukmini Maha Puja