200 कोटीवर पिकांचे नुकसान

crop
crop

अकाेला ः आॅक्टाेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र पाच तालुक्यातील महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेमवार (ता. 11) पर्यंत सादर केलेल्या संयुक्त नुकसानीच्या अहवालानुसार संबंधित तालुक्यात 191 काेटी 58 लाख 77 हजार 732 रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप संयुक्त अहवाल तयार न झाल्याने नुकसानीचा अंतिम अहवाल केव्हा तयार हाेणार व शेतकऱ्यांना तातडीने मदत केव्हा मिळणार, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले अाहेत.

गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारीसह अनेक पिकांचे नुकसान झाले. शेतात उभ्या असलेल्या ज्वारीच्या कणसांना काेंब फुटले. त्यासाेबतच कापूस सुद्धा आेलाचिंब झाला. हाताताेंडाशी आलेला घास अचानक हिसाकावल्या गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. परिणामी या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सुरुवातीला लाेकप्रतिनधींमध्ये स्पर्धाच लागली हाेती. नवनिर्वाचित आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांसाेबत संवाद साधला. दरम्यान अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असले तरी अद्याप अकाेला, बार्शिटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर तालुक्यांचा महसूल, जिल्हा परिषद व कृषि विभागाचा संयुक्त अहवाल तयार झाला अाहे. त्यामध्ये 33 टक्क्यावर नुकसान झालेल्या क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु अकाेट व पातूर तालुक्यातून अहवाल प्राप्तच न झाल्याने शेतकऱ्यांची मदत लांबच असल्याचे दिसून येत आहे.


जिरायती क्षेत्राचा संयुक्त अहवाल (हेक्टरमध्ये)
तालुका        शेतकरी      संख्या      क्षेत्र (जिरायती) नुकसान
अकाेला        62128     70431     47८९8930800

बार्शिटाकळी  34626      45449      315853200

तेल्हारा       40139      47561      323414800

बाळापूर      46629      54880      373185564

मूर्तिजापूर    40794      55428      376912168

एकूण         224316    274749     1868296532


असे झाले 33 टक्क्यावर पिकांचे नुकसान
- अकाेला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर तालुक्यातील 2 लाख 74 हजार 749.5 हेक्टरवरील क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे बाधित झालेल्या 2 लाख 24 हजार 316 शेतकऱ्यांचे 168 काेटी  82 लाख९६ हजार  532 रुपयांचे नुकसान  झाले आहे.


- संयुक्त स्वाक्षरी अहवालनुसार पाच तालुक्यातील फळ पिकाखालील 2 हजार 191.6 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याचा 40 हजार 711 शेतकऱ्यांना फटका बसला असून त्यांचे 3 काेटी 94 लाख 48 हजार 800 रुपयांचे नुकसान झाले आहे.
- पाच तालुक्यातील फळ पिके साेडून 602.4 हेक्टरवरील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. 40 हजार 541 शेतकऱ्यांचे 81 लाख 32 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले आहे.

अकाेला तालुक्यातील सर्वाधिक गावं बाधित
सध्या चार तालुक्यांचा संयुक्त अहवाल तयार झाला अाहे. त्यानुसार 724 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले अाहे. या चार पैकी अकाेला तालुक्यातील 194 गावं बाधित झाली अाहे. बार्शीटाकाळी 157, तेल्हारा 106, बाळापूर 103 अाणि मूर्तिजापूर तालुक्यात 164 गावं बाधित झाली अाहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com