Video : घराला लागली आग; मग झाले सिलिंडरचे स्फोट, दोघे...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सिलिंडरच्या स्फोटात अजय गुजरे तसेच शुभम गुजरे किरकोळ जखमी झाले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब लागले. काहींच्या मते शॉर्ट सर्क्रिटने आग लागल्याचा अंदाज आहे. तर काहींचे सिलिंडर पाइप लिंक झाल्याचे म्हणणे आहे. 

यवतमाळ : स्थानिक पुष्पकुज सोसायटी परिसरात एका घराला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर लगतच्या दोन घरांनाही आपल्या कचाट्यात घेतले. आगीत तीन सिलिंडरचे स्फोट झाले. यात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. तीन घरे, गादी कारखाना तसेच ऍक्वा कॅन असे जवळपास वीस लाखांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (ता.23) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. 

प्राप्त माहितीनुसार, वडगाव परिसरात अजय गुजरे यांचे घर आहे. त्यांच्या घरातच गादी कारखान्याला जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. त्यांच्या घराशेजारी असलेल्या एका घराला सुरुवातीला आग लागली. काही कळाण्याआधी आता याठिकाणी सिलिंडरचा पहिला स्फोट झाला. त्यानंतर लगतच्या घरापर्यंत आग पोहोचली. याठिकाणीही सिलिंडरचा स्फोट झाला. 

हेही वाचा - अल्पवयीन मुलगी सुट्ट्यांमध्ये मामाकडे राहायला आली अन् गर्भवती झाली; मग कुटुंबीयांनी पुण्यात केली प्रसूती

पालिकेची अग्निशमन यंत्रणा येईपर्यंत आग गुजरे यांच्या घरापर्यंत पोहोचली. या आगीत गादी कारखाना तसेच गुजरे यांचे घर व लगतच्या अन्य दोन घर जळून खाक झालेत. नुकसानीचा आकडा वीस लाखांच्या वर आहे. सिलिंडरच्या स्फोटात अजय गुजरे तसेच शुभम गुजरे किरकोळ जखमी झाले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब लागले. काहींच्या मते शॉर्ट सर्क्रिटने आग लागल्याचा अंदाज आहे. तर काहींचे सिलिंडर पाइप लिंक झाल्याचे म्हणणे आहे. 

आगीत वीस लाखांचे नुकसान

आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटी सिलिंडरच्या स्फोटाने हादरून गेली. सिलिंडर लिक झाल्यामुळे स्फोट झाल्याचे सांगितले जाते. यात गादी कारखाना, पाणी पुरी विक्रेत्याला फटका बसला. दोन दुचाकी बेचिराख झाल्या. तसेच वीस लाखांचे नुकसान झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage of Rs twenty lakhs due to cylinder explosion in Yavatmal district