esakal | Vidarbha | सणासुदीच्या तोंडावर भेसळखोरीचा धोका; व्यावसायिकांचा नफ्यावर डोळा
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीच्या तोंडावर भेसळखोरीचा धोका

सणासुदीच्या तोंडावर भेसळखोरीचा धोका; व्यावसायिकांचा नफ्यावर डोळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : दसरा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तर, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशपर्वाचा सण अर्थात दिवाळीसुद्धा साजरी होणार आहे. याच सणाच्या काळात व्यावसायिकांकडून भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीदरम्यान सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सणाच्या कालावधीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांची खरेदी केली जाते. त्याचा गैरफायदा घेत जादा नफ्यासाठी भेसळखोरी केली जाते. अन्नपदार्थातून विषबाधाही होऊ शकते. दरवर्षी अन्न व औषध प्रशासनाकडून सणाच्या पार्श्‍वभूमीवर अन्नपदार्थ तपासणीची मोहीम राबविली जाते. यंदाही मोहीम सुरू झाली आहे.

मिठाई, खोवा, रवा, आटा, मैदा, बेसन, हळद, मिरची पावडर व खाद्यतेलात भेसळ करून जादा नफा कमविण्यावर भर देतात. खाद्यपदार्थातील भेसळीने आरोग्यावर दुष्परिणाम होतात. खाद्यपदार्थात वापरण्यात येणाऱ्या सोड्यामुळे आतड्याच्या विकारांसह पोटाचे आजार होतात. शिनाय खाद्यतेलातील भेसळीमुळे अंपगत्वही येण्याची भीती आहे.

हेही वाचा: अभिनेत्री नीना गुप्ताला का चिडल्या? Video झाला व्हायरल

डाळ व मिठाईला देण्यात येणाऱ्या रंगामुळे किडनीचे गंभीर आजारदेखील होऊ शकतात. घाण व अस्वच्छ वातावरणात बनविलेल्या खाद्यपदार्थांमुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहूनच खरेदी करावी, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळेच भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यपदार्थ व धान्य तपासणीची मोहीम हाती घेतली आहे.

अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. मिठाई विक्रेते व किराणा दुकानदार यांच्याकडून मिठाई, तेल, वनस्पती, रवा, मैदा, बेसन आदी वस्तूंचे नमूने घेतले जात आहे.

- गोपाल माहोरे, अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग

loading image
go to top