esakal | शिक्षकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; कोविड केंद्रावर प्रचंड गर्दी; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा 
sakal

बोलून बातमी शोधा

danger for teachers as crowd at covid testing center

चाचणीसाठी आलेल्या शिक्षकांकडूनच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचा प्रकार दिसून आला. त्यामुळे चाचणीसाठी आलेल्या शिक्षकांनाच कोरोनाचा धोका होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

शिक्षकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; कोविड केंद्रावर प्रचंड गर्दी; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा 

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात शिक्षकांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहे. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने शुक्रवारी कोविड केअर सेंटर येथे शिक्षकांची चाचणीसाठी गर्दी झाली. 

चाचणीसाठी आलेल्या शिक्षकांकडूनच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचा प्रकार दिसून आला. त्यामुळे चाचणीसाठी आलेल्या शिक्षकांनाच कोरोनाचा धोका होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवार (ता.23) पासून इयत्ता नववी ते बारावीपर्यतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व शिक्षकांच्या कोविड चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या जवळपास एक लाख विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तीन हजार 397 शिक्षक आहेत. 

या सर्व शिक्षकांना सोमवारपर्यंत चाचणी करून रिर्पाट देणे गरजेचे आहे. त्यानुसार 40 टक्के शिक्षकांच्या चाचणी झाल्या आहेत. उर्वरित शिक्षकांना तीन दिवसात तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.20) जिल्ह्यातील सर्वच कोविड केअर सेंटर येथे तपासणीसाठी शिक्षकांची गर्दी झाली होती. 

यवतमाळ, दारव्हा, आर्णी , पुसद अशा अनेक ठिकाणी शिक्षकांची स्वॅब देण्यासाठी मोठी उपस्थिती होती. एकाच वेळी झालेल्या गर्दीने कोरोना पसरण्याचा धोका अधिक वाढला आहे. याठिकाणी शिक्षकांनीच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्याचे दिसून आले. या गर्दीत एखादा पॉझिटीव्ह रुग्ण आल्यास इतरही शिक्षकांना कोरोनाचा धोका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जाणून घ्या - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव

तेराशे शिक्षकांची तपासणी

जिल्ह्यात तीन हजार 397 शिक्षक आहेत. यातील तेराशे शिक्षकांची तपासणी गुरुवार (ता.19) पर्यंत झाली आहे. उर्वरित शिक्षकांची चाचणी करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. जिल्ह्यात नववी ते दहावीचे 89 हजार 988 तर अकरावी ते बारावीचे 59 हजार 797 विद्यार्थी आहेत. यांच्यासाठी तीन हजार 855 वर्गखोल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी शिक्षकांवर असणार असून विद्यार्थ्यामध्ये फिजिकल डिस्टिंसिग ठेवणे महत्वाचे असणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ