विमानतळालगतच्या इमारतींचे धोकादायक माळे पाडणार

file photo
file photo

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर लॅंडिंगच्या वेळी अडचणीच्या ठरणाऱ्या जयताळा येथील सहा उंच इमारतींना मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ने नोटीस बजावल्या आहेत. इमारतींचे धोकादायक ठरणारे काही माळे पाडले जाणार आहेत.
इमारतमालकांना 30 दिवसांमध्ये धोकादायक भाग स्वखर्चाने पाडण्याची ताकीद देण्यात आली आहे. सोबतच आक्षेप असल्यास 25 दिवसांच्या आत उत्तर मागविण्यात आले आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या इमारतींमध्ये जयताळ्यातील रेणुका एनक्‍लेव्ह, साई बिल्डकॉन, तभाने ले-आउट, भामटी, ललित बिल्डर्स, फुलसुंघे ले-आउट, भामटी, ग्रीन अर्थ इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स, जीएनएसएस, भामटी, मिलिंद कालसैत, फुलसुंघे ले-आउट, इंद्रप्रस्थनगर, भामटी आणि महेश जांगीड, तभाने ले-आउट, भामटी या इमारतींचा समावेश आहे. विमानाच्या मार्गात अडथळा ठरणारे जयताळ्यातील दोन इमारतींवरील मोबाईल टॉवर हटविण्यासाठीसुद्धा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अडथळा ठरणारा भाग संबंधित मालकांनी न पाडल्यास, त्यांचा अहवाल डीजीसीएकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या मदतीने हे बांधकाम पाडण्यात येईल. एमआयएलने विमानतळाच्या 20 किमी परिघात बांधकामासंदर्भातील सर्वेक्षण करवून घेतले आहे. विमान येण्याच्या आणि जाण्याच्या मार्गात एकूण 19 इमारती धोक्‍याच्या आहेत. त्यातही 6 इमारती सर्वाधिक धोक्‍याच्या आहेत. या संदर्भात वैमानिकांनीसुद्धा वारंवार तक्रारी केल्या आहेत. विमानतळाचा भागीदारीत विकास साधण्यात येणार आहे. तिसरा भागीदार येण्यापूर्वी व्यवस्थापनाने कठोर पावले उचलणे सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com