esakal | सौंदत्ती रेणुका देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

 सौंदत्ती रेणुका देवी

बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले झाले असल्याने नवरात्रोत्सवासाठी वायव्य परिवहन महामंडळाने विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. यासाठी ४० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकावर त्यासाठी विशेष पिकअप पॉइंट सुरू करण्यात आले आहे.

वायव्य परिवहन महामंडळाकडून दरवर्षी नवरात्र आणि देवीच्या उत्सव काळात विशेष पिकअप पॉइंट सुरू करून प्रवाशांसाठी बेळगाव ते सौंदत्ती थेट विनाथांबा बससेवा सुरु केली आहे. आज पासून मध्यवर्ती बसस्थानकावर ही सेवा उपलब्ध असून नवरात्रपर्यंत ती कायम असणार आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : राज्यावरील सर्व संकट दूर कर; खासदार पाटलांचे खंडोबाला साकडे

मागील वर्षी कोरोणा संसर्गामुळे सौंदत्ती यल्लमा मंदिराचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिवहन मंडळाची देखील विशेष सेवा उपलब्ध नव्हती. पण यंदा नवरात्र काळात मंदिर सुरू झालेले असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून भाविकांना मंदिरापर्यँत जाण्यासाठी परिवहन मंडळने अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली आहे.

त्यासाठी परिवहन मंडळाने ४० बसेस राखीव ठेवले आहेत. आज त्यापैकी पाच बसेसनी दिवसभर बेळगाव-सौंदत्ती मार्गावर सेवा दिली. उद्या (ता.८) शुक्रवार असल्याने सौंदत्ती डोंगरावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. त्यासाठी उद्या सर्व ४० अतिरिक्त बसेस प्रवाशांसाठी तैनात असणार आहेत. या काळात प्रवाशांची गर्दी वाढल्यास त्यानुसार आणखी अतिरिक्त बसेस या मार्गावर उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दैनिक 'सकाळ' ला दिली.

loading image
go to top