शाळा सुरू होईपर्यंत डीबीटी बंदच, शैक्षणिक साहित्यासाठी मदत मिळणे अशक्यच

संतोष ताकपिरे
Thursday, 19 November 2020

निवासी आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश, बुटांसाठी ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम डीबीटीच्यास्वरुपात विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या नावे असलेल्या आधारलिंक बँक खात्यामध्ये जमा होत असते.

अमरावती : आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेअंतर्गत शैक्षणिक गणवेश, बुटांसाठी आर्थिक मदत केली जाते. परंतु, शाळाच बंद असल्यामुळे हा लाभ आश्रमशाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.

हेही वाचा - फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला...

निवासी आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश, बुटांसाठी ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम डीबीटीच्यास्वरुपात विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या नावे असलेल्या आधारलिंक बँक खात्यामध्ये जमा होत असते. परंतु, कोरोना विषाणूंची लागण सुरू झाल्यापासून राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांनाही कुलूप लागले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यापर्यंत अनलॉक लर्निंगच्या माध्यमातून पोहोचण्याचे धोरण राबविले जाते. पुस्तक जवळपास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्याचा दावाही केला गेला. गणवेश, बुटांची रक्कम शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच महिन्यात, पावसाळ्यात रेनकोट, तर हिवाळ्यात स्वेटर निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दिले जाते.

हेही वाचा - विदेशातील गुंतवणूक भोवली, राष्ट्रवादीचा बावनकुळेंवर...

यावर्षी पावसाळ्यात शाळाच झाली नाही. हिवाळा सुरू आहे. त्यामुळे शासकीय योजनेतून मिळणाऱ्या स्वेटरच्या लाभापासूनही आदिवासी विद्यार्थ्यांना अलिप्त राहावे लागण्याचीच शक्‍यता आहे. कारण त्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून धोरण ठरले नसल्यामुळे संभ्रम कायम आहे. शहराच्या ठिकाणी असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनासह स्टेशनरीचा खर्च डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत होता. परंतु, वसतिगृहाच्या इमारती बंदच आहेत. त्यामुळे शाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थी शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत डीबीटीच्या लाभापासून वंचित राहण्याचीच शक्‍यता अधिक आहे. 

हेही वाचा - Success Story: भाजी विकून आणि वृत्तपत्र वाटून '...

शासनाकडून त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल.
-विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DBT scheme closed till school not open in amravati