वाहून गेलेल्या ममताचा तब्बल चार दिवसांनी आढळला मृतदेह

सूरज पाटील
Wednesday, 14 October 2020

यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बॅंकेचे व्यवस्थापक संतोष कुमार १० रोजी शनिवारी सुटी असल्याने आपल्या कुटुंबीयांसह सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले होते.

सहस्त्रकुंड (जि. यवतमाळ) ः  १० आॅक्टोबर रोजी पैनगंगा नदीवरील मुरली येथील बंधाऱ्याचे पाणी अचानक सोडण्यात आल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी अलेली एक महिला पर्यटन वाहून गेल्याची घटना सायंकाळी चार वाजेदरम्यान घडली होती. तब्बल चार दिवसांनी सदर महिलेचा मृतदेह आढळून आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बॅंकेचे व्यवस्थापक संतोष कुमार १० रोजी शनिवारी सुटी असल्याने आपल्या कुटुंबीयांसह सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले होते. सर्व जण नदीकाठी उभे राहून मनमोहक दृश्याचा आनंद घेत असताना पैनगंगा नदीवर  मुरली गावाच्या वरच्या बाजूने असलेल्या बंधाऱ्यातील पाणी अचानक सोडण्यात आले.

हेही वाचा - राजीनाम्यासाठी बळजबरी : मीटिंगच्या नावाने बोलावले अन् कर्मचाऱ्यांना कोंबून ठेवले; धक्कादायक प्रकार
 

त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली त्यात ममता कुमारे वाहून गेल्याची घटना घडली होती.  तब्बल चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज त्यांचा मृतदेह अचानक आढळून आला.  शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिस प्रशासनाने परिश्रम घेतले. बिटरगावचे सपोनि विजय चव्हाण, व इस्लापूरचे सपोनि किनगे, उपनिरीक्षक कांदे, यांनी सहकार्य केले. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the dead body of woman was found four days later