

Dead Girl Returns Alive? Police Investigation Under Fire!
esakal
जळगाव जामोद, ता. २८ : एक महिन्यापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात मुंडके नसलेल्या स्त्रीचे अर्धवट जळालेले प्रेत आढळून आले होते. या प्रकरणात बुलडाणा पोलिसांनी वडील आणि मुलगा या दोघांना अटक करून त्यांनीच खून करून प्रेत जाळल्याचा दावा केला होता. मात्र, ज्या मुलीच्या खुनाचा दावा पोलिसांनी केला, तीच मुलगी आता पोलिसांसमोर हजर झाली असून तिने अटकेत असलेल्या भाऊ आणि वडिलांना मुक्त करण्याची मागणी केल्याने प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.