
शहरात वेगवेगळ्या इमारतींमध्ये बरेच खासगी कोविड रुग्णालये सुरू झालीत. कोविडमुळे मृत्यू झाल्यास अधिक व्यक्ती त्या मृतदेहासोबत असू नये याची काळजी घेतली जाते. मृतदेहाभोवती पीपीई किट असतो,
अमरावती ः कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षित अंतर ठेवावे, असे प्रशासनाचेच आदेश आहेत. कोविडमुळे मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी दोनच व्यक्ती असतात. प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोविडचे स्वतंत्र रुग्णालये उभारल्या गेली. पण कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरात वेगवेगळ्या इमारतींमध्ये बरेच खासगी कोविड रुग्णालये सुरू झालीत. कोविडमुळे मृत्यू झाल्यास अधिक व्यक्ती त्या मृतदेहासोबत असू नये याची काळजी घेतली जाते. मृतदेहाभोवती पीपीई किट असतो, तरीही असे मृतदेह घरी नेण्याची परवानगी नाही. अशा मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात नाही. नातेवाइकांना बोलावून कोविड रुग्णालयातून मृतदेह देण्याची व्यवस्था व्हायला हवी. परंतु नव्वद टक्के कोविडचे मृतदेह इर्विनच्या शवागारात पाठविले जातात व तेथील जुन्या फ्रीजरमध्ये ठेवल्या जाते.
उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतोय; मार्चच्या पहिल्या...
त्यात विविध कप्पे असले तरी फारच अरुंद आहेत. दहा मृतदेह एकाचवेळी ठेवण्याची क्षमता आहे. नियमित होणारे अपघात, मारामारी यासह विषप्राशन करून, गळफास घेऊन झालेल्या आत्महत्या, शहरात बेवारस आढळलेले मृतदेह दररोज येथे येत असतात. ते मृतदेह ज्याठिकाणी ठेवल्या जातात तेथेच कोविडचे मृतदेह ठेवण्यात येतात. शवागाराच्या आवारात पंचनामा करण्यासाठी पोलिस, इर्विनचे कर्मचारी, पोलिसांच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यासाठी मृत व्यक्तींचे नातेवाईक, शवविच्छेदनासाठी हजर असलेले डॉक्टर असे सर्वच जण शवागारात वावरतात.
येथील स्टीलचे जे नवीन पाच फ्रीजर आहेत, त्यामधेही दहा मृतदेह ठेवता येतात. परंतु ते वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून बंद पडलेले आहे. तेथे मृतदेह ठेवले तरी दुर्गंधी पसरते. काही फ्रीजरचा वापरच केल्या जात नाही. असे फ्रीजर तातडीने दुरुस्त करून त्यामध्ये कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह एका बाजूने ठेवता येऊ शकतात. ज्यामुळे मृतदेह ठेवताना व अंत्यसंस्कारासाठी नेताना सामान्य व्यक्ती त्यापासून दूर राहू शकतो, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
प्रतीक्षालयाला कायमचे कुलूप
शवागारालगत प्रतीक्षालय आहे. त्याचा उपयोग कधीच झालेला नाही. कारण अनेक वर्षांपासून सतत कुलूप असते. येथे बंद पडलेले फ्रीजर दुरुस्त करून कोविडचे मृतदेह ठेवण्याची व्यवस्था होऊ शकते. किंवा नातेवाईक व पंचनामा करणारे पोलिस यांना तरी बसण्याची व्यवस्था होऊ शकते. परंतु आरोग्य व्यवस्था गंभीर दिसत नाही.
निर्दोष सुटलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक करून गुन्हेगारांप्रमाणे काढले फोटो; नागपूर...
कोविडच्या मृतदेहाभोवती पीपीई किटचे घट्ट आवरण असते. त्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होत नाही. बंद पडलेले फ्रीजर आवश्यकतेनुसार दुरुस्त केले जातात.
- डॉ. श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.
संपादन - अथर्व महांकाळ