कोरपनाजवळ भीषण अपघात, 11 प्रवासी ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

कोरपना (चंद्रपूर) : येथून जवळ असलेल्या हेटी गावाजवळ काळीपिवळी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 11 प्रवासी ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली असून 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

कोरपना (चंद्रपूर) : येथून जवळ असलेल्या हेटी गावाजवळ काळीपिवळी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 11 प्रवासी ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली असून 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
एमएचटी 29-8582 या क्रमांकाची काळीपिवळी ही वणीकडे जात होती. या वाहनात एकूण 15 प्रवासी होते तर अपघातास कारणीभूत असलेला ट्रक एमएचटी 29-1683 हा कोरपनाकडे येत होता. हेटी गावाजवळ आल्यानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या काळीपिवळीला धडकला. ही धडक एवढी जोरात होती की काळीपिवळीचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळीच 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि एका दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. चार जण गंभीर जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातातून 9 महिन्यांचा मुलगा बचावला. काळीपिवळी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकचालक फरार झाला आहे. काळीपिवळीतील सर्व प्रवासी हे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील असल्याचे समजते. अद्याप कुणाचीही ओळख पटलेली नाही. रात्रीची वेळ असल्याने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात थोडा उशीर झाला. मजुरीसाठी दुसऱ्या ठिकाणी गेलेले सर्वजण आपल्या गावी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Web Title: The deadly accident near Korapana, 11 passengers killed

टॅग्स