मजुरांचा ट्रक उलटून एक ठार, 35 जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

गडचिरोली - तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांचा ट्रक उलटून एक ठार तर 35 मजूर जखमी झाले. हा अपघात उमानूर पहाडीवर घडला.

गडचिरोली - तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांचा ट्रक उलटून एक ठार तर 35 मजूर जखमी झाले. हा अपघात उमानूर पहाडीवर घडला.

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथून दोन ट्रकमधून सुमारे 130 मजुरांना सिरोंचा- आल्लापली मार्गाने गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम येथे नेले जात होते. जो ट्रक उलटला त्यातून 74 मजूर प्रवास करीत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: death in accident