नागपूर जिल्ह्यात 646 जणांना डेंगीचा डंख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नागपूर : विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत 32 जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील 20 जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे 543 तर ग्रामीण भागात 103 असे जिल्ह्यात एकूण रुग्ण आढळून आले आहेत. यात 11 जण दगावले आहेत. विशेष असे की, शहर डेंगीमध्ये "टॉप' आहे. खासगी रुग्णालयात ऑगस्टमध्ये डेंगीने अभियंता दगावल्याचे घोषित करण्यात आले होते. यानंतरही महापालिकेच्या नोंदीत "डेंगी'च्या मृत्यूची नोंद नाही. यावरून महापालिकेच्या आरोग्यसेवेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

नागपूर महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक डेंगीग्रस्त आढळल्यानंतरही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. डास निर्मूलनाची कोणतीही मोहीम महापालिकेने प्रभावीपणे राबवली नाही. डेंगीवर कोणतेही ऍण्टीबायोटिक किंवा ऍण्टीव्हायरल औषधोपचार उपलब्ध नाही. डेंगी झाल्यास मृत्यूचा धोका 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. त्याउपरही महापालिकेच्या हद्दीत 543 डेंगीग्रस्तांपैकी एक डेंगीचा रुग्ण दगावला नसल्याचे आरोग्य विभागाच्या नोंदीत आहे. यावरून महापालिकेचा आरोग्य विभागात साथ नियंत्रणाबाबत अतिशय तत्पर असल्याचे दिसून येते. कमाल चौकापासून ते इंदोरा भागात किमान ते मोठी आणि छोटी खासगी रुग्णालये आहेत. यातील प्रत्येक रुग्णालयात डेंगीचे सरासरी पाच रुग्ण दाखल असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, जरीपटका, कपिलनगर, नारा-नारी, पिवळी नदी, ख्वाजा गरीब नवाजीनगर, महेंद्र नगर, कांजी ओळ, वैशालीनगर भागातही जागोजागी वाढलेल्या झुडपांमुळे डेंगीच्या डासांची पैदास वाढली आहे.
पूर्व विदर्भात 1177 डेंगीग्रस्त
सार्वजनिक आरोग्याच्या नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात 646 डेंगीग्रस्तांसह चंद्रपूर जिल्ह्यात 236 तर वर्धेत 169 जणांना डेंगीचा डंख बसला आहे. भंडारा जिल्ह्यात 2 तर गोंदियात अकरा आणि गडचिरोलीत डेंगीचे केवळ 13 रुग्ण आढळले आहेत. डेंगीने उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनाही यावर्षी सोडले नाही. मेयोतील 50 तर मेडिकलमधील 39 आणि दंत रुग्णालयातील 8 ते 9 भावी दंत चिकित्सकांनाही डेंगीचा विळखा बसला आहे.
राज्यात डेंगीचे 21 मृत्यू
राज्यात आतापर्यंत 5 हजार 300 जणांना डेंगीचा विळखा बसला आहे. यातील 21 जण दगावले आहेत. डेंगीच्या मृतांमध्ये नागपूर विभागात वर्धा जिल्हा टॉपवर आहे. वर्धेत डेंगीने 9 तर नागपूर जिल्ह्यात 2 जण दगावले आहेत.

Web Title: death of dengu news