डेंगीमुळे युवकाचा मृत्यू

File photo
File photo

नागपूर : विदर्भात स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव पसरला असताना डेंगीचा प्रकोप सुरू झाला आहे. डेंगीने वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तुषार काबरा (वय 33, रा. प्रतापनगर) असे मृताचे नाव आहे. यापूर्वीही निवृत्त अभियंत्याचा व्होक्‍हार्टमध्ये डेंगीने मृत्यू झाला होता. विशेष असे की, डेंगीने उपराजधानीत मेडिकलमध्ये 25 विद्यार्थी डेंगीच्या संशयाने भरती आहेत. तर विदर्भात 750 डेंगीग्रस्त आढळून आले असल्याची नोंद आरोग्य विभागात आहे. यातील नागपूर जिल्ह्यातील 215 डेंगीग्रस्तांचा समावेश आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे 21 सप्टेंबरपर्यंत 133 रुग्णांची नोंद आहे. यापेक्षा मोठ्या संख्येने डेंगीग्रस्त असल्याची चर्चा शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये आहे. डेंगीग्रस्त वाढत असूनही महापालिकेचा आरोग्य विभाग नियंत्रणासाठी फॉगिंगदेखील करीत नाही. मेडिकलच्या हद्दीत अद्याप फॉगिंग झाले नसल्याचे सांगण्यात आले. सर्व कर आकारत असूनही या भागात फॉगिंग का होत नाही, असा सवाल मेडिकल प्रशासनाने केला आहे.
स्वाइन फ्लूने एक दगावला
स्क्रब टायफस, डेंगीसोबतच स्वाइन फ्लूनेही पाय पसरले असून खामला परिसरातील 63 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा स्वाइन फ्लूच्या बाधेने मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागात बुधवारी नोंदवली गेली. यामुळे स्वाइन फ्लूने आतापर्यंत 6 मृत्यू झाले असून 34 जणांना लागण झाली आहे.
डॉक्‍टरांना क्षयरोग
मेडिकल, दंत, एम्सच्या भावी डॉक्‍टरांना डेंगीने डंख मारला आहे. त्यापाठोपाठ क्ष-किरणशास्त्र विभागातील 2 निवासी डॉक्‍टरांना क्षयरोग झाला असल्याची माहिती बुधवारी कॉलेज कौन्सिलच्या बैठकीतून उघडकीस आली. दोन्ही डॉक्‍टर दीर्घ रजेवर गेले आहेत. यामुळे मेडिकलमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मात्र, मेडिकल प्रशासनाने आतापर्यंत केवळ 5 विद्यार्थ्याना डेंगी झाल्याचे सांगितले असून त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com