वीज कोसळून अभियंत्याचा मृत्यू

file photo
file photo

ढाणकी (जि. यवतमाळ) : शेतात गेलेल्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. सहा) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील सावळेश्‍वर शिवारात घडली. शहादतखॉं शम्मीउल्लाखॉं पठाण (वय 22, रा. ढाणकी) असे मृताचे नाव आहे. तो हैदराबाद येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. गेल्या दोन दिवसांपूर्वीच तो ढाणकी येथे आलेला होता. रविवारी वडिलांसह शेतात गेला असताना, विजेचा कडकडाट होऊन वीज त्याच्यावर कोसळली. त्यात शहादतचा मृत्यू झाला. त्याच्या मागे एक भाऊ व दोन बहिणी आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com