अपघातात बापलेकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

काचेवानी/तिरोडा (जि. गोंदिया) - भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना बरबसपुरा-एकोडी मार्गावर बुधवारी (ता.१८) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. 

जीवन हिरालाल झगेकार (वय ६२) व संतोष जीवन झगेकार (वय २८, दोघेही रा. बेरडीपार) अशी मृतांची नावे आहेत. एमएच ३५- ए. ७१७८ क्रमांकाच्या दुचाकीने जीवन झगेकार हे मुलगा संतोषसह बेरडीपार येथून एकोडीकडे जात होते.

 याचवेळी मागून आलेल्या आणि तिरोड्याकडे जाणाऱ्या बोलेरो (एमएच-१४-ईएम-४२८४) वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी बोलेरोखाली सापडली. यात जीवन झगेकार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, संतोषचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. बोलेरो वाहनावर ऑन ड्यूटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असे लिहिले आहे. बॅंकेची रक्कम वाहनात होती. त्यामुळे हे वाहन बॅंकेचे असावे, असा अंदाज आहे. 

गंगाझरी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, आरोपी चालक नरेश नारायण हटेले (वय ४१, रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया) याला अटक केली आहे. अपघातानंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. आमदार विजय रहांगडाले व माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी घटनास्थळ गाठून शांततेचे आवाहन केल्याने जमाव शांत झाला.

Web Title: Death of the father and sonf in the accident

टॅग्स