esakal | अमरावती कारागृहातील वृद्ध बंदीचा मृत्यू; पोस्को कायद्यान्वये झाली होती शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती कारागृहातील वृद्ध बंदीचा मृत्यू

अमरावती कारागृहातील वृद्ध बंदीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी दहावर्षे सश्रम कारावासाची शिक्षा उपभोगणाऱ्या बंदीचा मंगळवारी (ता. ३१) मृत्यू झाला. बाळकृष्ण कोडू बाईत (वय ६३, रा. चेंबूर, मुंबई) असे मृत बंदीचे नाव आहे. मृत व्यक्तीचा बंदी क्रमांक ५६५६ असा होता.

मंगळवारी (ता. ३१) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भोवळ आल्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान बंदीचा मृत्यू झाला. सदर व्यक्तीविरुद्ध सन २०१७ मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त सत्र न्यायालय (पोस्को), शहर सत्र न्यायालय ग्रेटर मुंबई यांनी १० वर्षे सक्तमजुरीसह २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १४ दिवस अतिरिक्त शिक्षा आरोपीस भोगावी लागणार होती.

हेही वाचा: चंद्रपूर : बल्लारपुरात पुन्हा टोळीयुद्ध, एकाची हत्या

२९ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई न्यायालयाने बाळकृष्ण बाईत याला ही शिक्षा सुनावली होती. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सदर बंदीस पुढील शिक्षा भोगण्यासाठी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात आणून दाखल केले होते. मृत्यूनंतर कारागृह प्रशासनाने मृत बंदीच्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली.

फ्रेजरपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. बुधवारी (ता. १) न्यायदंडाधिकारी, नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात पंचनामा झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविण्यात आला.

loading image
go to top