esakal | प्रसूतीच्या दोन तासांनी महिलेचा मृत्यू; डॉक्टर, परिचारिकांचा हलगर्जीपणा?
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

प्रसूतीच्या दोन तासांनी महिलेचा मृत्यू; हलगर्जीपणा केल्याचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : प्रसूतीनंतर अवघ्या दोन तासांत महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूस डॉक्टर, परिचारिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला. त्यामुळे डफरीन रुग्णालयात मध्यरात्रीनंतर राडा झाला.

आम्रपाली संतोष महाजन (वय ३०, रा. वाठोडा शुक्लेश्वर) या महिलेला प्रसूतीसाठी सोमवारी (ता. ११) जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) दाखल केले होते. बुधवारी (ता. १३) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास महिलेची प्रसूती होऊन एका मुलीस जन्म दिला. शस्त्रक्रिया करून त्यांची प्रसूती झाली. ऑपरेशन थिएटरमध्ये असतानापासून मोठ्या प्रमाणात महिलेचा रक्तस्राव सुरू होता.

हेही वाचा: डॉ. शेवाळेने रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग! स्टिंग ऑपरेशन

अशाच स्थितीत योग्य उपचार न करता त्यांना वॉर्डामध्ये हलविले. त्यानंतर रक्तस्राव सुरूच असल्याने प्रकृती अधिकच खालावली. गंभीर अवस्थेत सदर महिलेस उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आम्रपाली यांच्या मृत्यूस डफरीन प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी करून, डॉक्टर, परिचारिकांविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुरुवारी (ता. १४) मृत महिलेच्या नातेवाइकांचे बयाण नोंदविले. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. दोषी डॉक्टरांविरुद्ध कारवाईची मागणी महिलेच्या नातेवाइकांनी केली.

नातेवाइकांच्या आक्षेपानंतर तपासात काही त्रुट्या राहू नये यासाठी शवविच्छेदनाच्या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच महिलेच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे
loading image
go to top