उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या चिमुकलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

वणी (जि. यवतमाळ) : सर्पदंश झालेल्या चिमुकल्या मुलीला उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्यावर वेळीच उपचार न झाल्याने तिचा शुक्रवारी (ता. 12) मृत्यू झाला. शिवन्या कांबळे (वय तीन) असे मृत मुलीचे नाव आहे.

शिवन्या रात्री आईच्या कुशीत झोपी गेली असता, तिला सापाने दंश केला. ही घटना लक्षात येताच तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी रुग्णालयात उपचार न करता तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील डॉक्‍टर अनुपस्थित होते. उपचाराअभावी मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्याने चंद्रपूरला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात वेळीच उपचार करण्यात न आल्याने मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a snake bite due to lack of treatment